शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगाव येथे जलसाक्षता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 17:58 IST

ठाणगाव- तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव येथे युवा मित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले.

युवा मित्र संस्थेचे संस्थापक सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना गावातील भूजल पातळीत वाढ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.पाणी वापर संस्थेचे महत्त्व, नियोजन व व्यवस्थापन, जबाबदारी तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात भर पाडता येईल याची माहिती लोणारे यांनी ग्रामस्थांना दिली.महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेत युवा मित्र, टाटा ट्रस्ट व ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र संस्थेच्या जलसमृध्दी प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाखाली जलस्त्रोतांमधील गाळ काढण्याची प्रकिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये युवा मित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउंडेशनमार्फत पोकलेन मशीन, महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल. तसेच लोकसहभागातून बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक करण्यात येणार आहे. गावातील पाणी वापर व नियोजन याबाबतचा विकास आराखडा उपस्थित ग्रामस्थांकडून तयार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच नामदेव शिंदे, संस्थेचे क्षेत्र समन्वयक वैभव आव्हाड, ए. टी. शिंदे, विजय शिंदे, संजय काकड, देवराम भोर, सोमनाथ शिंदे, सोपान शिंदे, रामनाथ शिंदे, आनंदा गुंड, उल्हास काकड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी