शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९० लाखांच्या उत्पन्नावर पाणी : ‘एस.टी’ची चाके फिरलीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:47 IST

शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती.

ठळक मुद्देलांब पल्ल्याची बस वाहतूक संपूर्णपणे बंद राहिली. दुपारनंतर केवळ चार ते सहा बसेस रस्त्यावर संप हा कर्मचा-यांमधील सरकारविरुद्धचा असंतोष आणि उद्रेक

नाशिक : शहर बससेवा व शहरातून परगावी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेससची चाके संपाच्या दुसºया दिवशीही थांबलेलीच असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यंदा एसटीने पुकारलेला संप हा एकाही संघटनेच्या पाठिंब्याविना सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही संघटना संपाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे अघोषित संपाबाबत नेमकी चर्चा कोणासोबत करायची हा प्रशासन व सरकारपुढील मोठा प्रश्न आहे.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेल्या कामगारांच्या वेतनवाढीच्या निषेधार्थ बसचालक-वाहकांसह अन्य क र्मचा-यांनी अघोषित संपाचे हत्त्यार उपसले आहे. या संपामध्ये सहभागी संघटनांनी अधिकृतपणे आपला सहभाग स्पष्ट केलेला नाही किंवा संपाची जबाबदारीही घेतलेली नाही. संप हा कर्मचा-यांमधील सरकारविरुद्धचा असंतोष आणि उद्रेक असल्याचे संघटनांच्या पदाधिका-यांचे म्हणणे आहे. अचानकपणे पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दुस-या दिवशी शनिवारी (दि.९) संपाची धार तीव्र होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी बसफे-या अत्यंत तुरळक होत्या. लांब पल्ल्याची बस वाहतूक संपूर्णपणे बंद राहिली. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांची शोधाशोध करावी लागली.

शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. खासगी वाहतुकदारांना प्रवासी वाहतुकीचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याने थेट बसस्थानकाच्या आवारात खासकी वाहतुकदारांनी जीप, रिक्षांसह अन्य प्रवासी वाहने उभी करुन वाहतूक सुरू केल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले. एकूणच दिवसभर लाल परी रस्त्यावरुन जणू अदृश्य झाली होती. बसस्थानकांच्या आवारात शुकशुकाट पहावयास मिळत होता. रिक्षाथांबे, खासगी प्रवासी वाहतूक करणा-या बसेस, जीप, टॅक्सीच्या थांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली.

सकाळ सत्रात केवळ ३५ बसेस धावल्याजुना आडगाव नाक्यावरील पंचवटी आगारामध्ये शहर बस वाहतूक करणा-या बसेसच्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळच्या सत्रात ३५ बसेस रस्त्यावर दुपारी एक वाजेपर्यंत धावल्या; मात्र दुपारनंतर केवळ चार ते सहा बसेस रस्त्यावर येऊ शकल्या. यामध्ये नाशिकरोड, गिरणारेसाठी एक भगूरसाठी दोन बसेस धावल्या. एकूणच रात्री बारा वाजेपर्यंत आठशेपैकी केवळ तीनशे फे-या पूर्ण होऊ शकल्या.

टॅग्स :NashikनाशिकST Strikeएसटी संपBus Driverबसचालक