शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रांच्या दबावापोटीच गुजरातला पाणी : भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जाहीर सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेला विचारात घेतल्याशिवाय एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, असे सांगतात. मात्र २० जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी देण्यास परवानगी असल्याचे पत्र केंद्र शासनाला दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकरणी शासनाकडून जनतेची दिशाभूल होत आहे. राज्य भीषण दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असताना हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा घाट रचला जात असल्याची टीका माजी आमदार नितीन भोसले यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मालेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जाहीर सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेला विचारात घेतल्याशिवाय एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, असे सांगतात. मात्र २० जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी देण्यास परवानगी असल्याचे पत्र केंद्र शासनाला दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकरणी शासनाकडून जनतेची दिशाभूल होत आहे. राज्य भीषण दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असताना हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा घाट रचला जात असल्याची टीका माजी आमदार नितीन भोसले यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.भोसले पुढे म्हणाले की, एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. मात्र, दुसरीकडे सरकार गुजरातला शेतीसाठी महाराष्ट्राचे पाणी देण्याची भूमिका घेत आहे. या संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चा का करण्यात आली नाही.गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या लवादामध्ये गुजरातला पाणी देण्यासंदर्भात कोणतीही भूमिका नसताना हा प्रश्न लवादापुढे का मांडण्यात आला नाही, असा सवालही भोसले यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कालावधीत केलेल्या त्रिपक्षीय कराराचा मुद्दा पुढे करत महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देत आहेत. मात्र, ३ मे २०१०च्या करारामध्ये गुजरातला पाणी देण्यासंदर्भात कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याचे भोसले म्हणाले.जनतेपर्यंत जाणारमहाराष्टÑाचे हक्काचे पाणी महाराष्टÑालाच मिळायला पाहिजे यासाठी मराठवाड्यातील आठ तर उत्तर महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात पाणीयात्रा जनआंदोलन करून पाणीयात्रा काढण्यात येणार आहे. हक्काचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या टप्प्यात गुजरात पळवित असलेल्या पाण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यात पाणी वाचवण्यासाठी प्रत्यक्ष जनलढ्याची भूमिका राहणार आहे. गुजरातसोबत करण्यात आलेला करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी राहणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :MalegaonमालेगांवWaterपाणी