शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातील जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:27 IST

शंभर टक्के भरले : शेतकरी कृती समितीची धरणावरच बैठक

ठळक मुद्देधरणात नारळ सोडून जलपूजन करण्यात आले

घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणावर शेतकरी कृती समितीतर्फे पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांच्यावतीने जलपूजन करण्यात आले. इतर धरणांच्या तुलनेत भौगोलिक दृष्टया उगमस्थान कमी असतांनाही मुकणे धरण उंचीवाढीनंतर यंदा प्रथमच शंभर टक्के भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील मुकणे, पाडळी देशमुख, जानोरी, नांदगांव बुद्रुक , गोंदे दुमाला, कु-हेगाव, बेलगांव कु-हे, नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन या सर्व गावातील शेतक-यांच्या उपस्थितीत माजी सभापती कचरू शिंदे, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, मुकणेचे सरपंच हिरामण राव, जानोरीचे सरपंच अर्जुन भोर, भाऊसाहेब धोंगडे आदींच्या हस्ते धरणात नारळ सोडून जलपूजन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. चंद्रसेन रोकडे, अ‍ॅड. भाऊसाहेब भोर, पाडळीचे सरपंच खंडेराव धांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुखदेव दिवटे, नामदेव धोंगडे, संपत मुसळे, तुकाराम वारघडे, पाडळीचे उपसरपंच बाळासाहेब आमले, बाळू यंदे, बाळु मुसळे, शिवाजी गुळवे, ज्ञानेश्वर राव, गजीराम राव आदींसह मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण