शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:48 IST

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात नाशिकच्या वाट्याला एकही मंत्रिपद न आल्याने नाशिककरांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरले. नाशिकला प्रतिनिधित्व मिळेल, असे अनेकदा ठामपणे बोलले गेले मात्र मंत्रिपदाने नाशिकला सातत्याने हुलकावणी दिली.

नाशिक : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात नाशिकच्या वाट्याला एकही मंत्रिपद न आल्याने नाशिककरांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरले. नाशिकला प्रतिनिधित्व मिळेल, असे अनेकदा ठामपणे बोलले गेले मात्र मंत्रिपदाने नाशिकला सातत्याने हुलकावणी दिली.गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन जागा भाजपाला मिळाल्या तर चांदवड-देवळा मतदारसंघातून राहुल आहेर विधानसभेत निवडून गेले. त्यामुळे जिल्ह्यातून एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी नाशिककरांना अपेक्षा होती. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणण्यातही भाजप आमदारांची भूमिकादेखील महत्त्वाची राहिली. त्यामुळे नाशिकचा विचार होऊ शकेल, अशी दाट शक्यता होती. मात्र नाशिककरांच्या वाट्याला पुन्हा निराशाच आली.गेल्या चार वर्षांपासून नाशिकच्या मंत्रिपदाचा विषय सातत्याने चर्चेत राहिला. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी तीनही आमदारांमध्ये प्रचंड लॉबिंग सुरू होेते. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांच्यातील अंतर्गत स्पर्धाच मारक ठरल्याने नाशिकचे मंत्रिपद हुकले, अशी चर्चा लपून राहिली नाही. आपणालाच मंत्रिपद मिळेल, असा दावा तीनही आमदारांकडून वेळोवेळी केला गेला. त्यातून त्यांच्यातील अंतर्गत हेवेदावेदेखील समोर आले. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी एकमेकांना शह देण्याची संधी त्यांनी सोडली नाही. त्यामुळे वरवर दिसत नसले तरी त्यांच्यातील दुरावा कायम राहिला.मंत्रिमंडळ विस्ताराची जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा नाशिककरांच्या नजरा मुंबईकडे लागल्या होत्या. साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या विस्तारातही संधी मिळालेली नाही. यामुळे नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी फिरले गेले अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.पालकमंत्र्यांकडे लॉबिंगमंत्रिमंडळातील वजनदार नेते आणि भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवरही मंत्रिपद अवलंबून असल्याची चर्चा होती. सानप हे पालकमंत्र्यांच्या जवळचे मानले जात असल्याने त्यामुळे त्यांची किमान राज्यमंत्रिपदी तरी वर्णी लागेल, असे बोलले जात होते, मात्र हेही दिवास्वप्नच ठरले.तिघांचे भांडण, चौघांचेही नुकसान४शहरातील भाजपाच्या तीनही आमदारांमध्ये असलेली गटबाजी लक्षात घेता आमदार राहुल अहेर यांच्या नावावर एकमत होऊ शकते असेदेखील बोलले गेले. माजी मंत्री दौलतराव अहेर यांचे चिरंजीव आणि ग्रामीण भागातील तरुण चेहरा म्हणून राहुल अहेर यांच्याकडे पाहिले जाते. मात्र रविवारी झालेल्या मंत्रिमंडळात यापैकी कुणाचीही वर्णी लागली नाही.

टॅग्स :ministerमंत्रीNashikनाशिकMLAआमदार