शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ३१ मधील पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:16 IST

प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीगाव, पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमनपा सिडको विभाग : पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सिडको : येथील प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीगाव, पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच मध्यरात्री होणाºया पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता पिण्यापुरतेदेखील पाणी मिळत नसल्याने प्रभागाचा पाणीप्रश्न गंभीर बनला असून, याबाबत प्रभागाच्या नगरसेवकांनीदेखील प्रभाग सभेत लक्षवेधी सूचना मांडल्या आहेत.सिडको प्रभाग क्रमांक ३१चा समावेश असून, या प्रभागात शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही समावेश होतो. या प्रभागातील पाथर्डीगाव, दाढेगाव, पिंपळगाव परिसर, वासननगर, कडवेनगर, अयोध्यानगर, प्रशांतनगर, आनंदनगर, कल्पतरूनगर, स्वामी समर्थनगर या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या प्रभागातील काही भागांत मध्यरात्री केव्हातरी पाणीपुरवठा होत असून, यातही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. मध्यरात्री होणाºया पाणीपुरवठ्यामुळे अनेक नागरिक आजारी पडल्याचे सांगत याबाबत प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे व पुष्पा आव्हाड यांनी प्रभाग सभेत लक्षवेधी सूचना मांडत प्रभागातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी केली. धरणात मुबलक पाणीपुरवठा असताना पाणी मिळत नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई