शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुकणे योजनेच्या कामाला जलसाठ्याचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:58 IST

महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ६९ टक्के काम झाले आहे. परंतु, धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली आहेत. धरणात सुमारे ९५ टक्के जलसाठा असल्याने कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि.२२) योजनेच्या कामांची पाहणी करून धरणातील पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.

नाशिक : महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ६९ टक्के काम झाले आहे. परंतु, धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली आहेत. धरणात सुमारे ९५ टक्के जलसाठा असल्याने कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि.२२) योजनेच्या कामांची पाहणी करून धरणातील पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.  आयुक्तांनी मुकणे धरण जलाशय येथील हेडवर्क्सच्या कामांची पाहणी केली. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे मुकणे धरणात सुमारे ९५ टक्के इतका जलसाठा झालेला असून, मागील १० वर्षांत धरण एवढ्या मोठ्या प्रमाणात भरले आहे. धरणातील जलसाठ्यामुळे जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद झालेली आहेत. सद्यस्थितीत हेडवर्क्सचे काम ५८ टक्के इतकेच झालेले आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय हेडवर्क्सची उर्वरित कामे सुरू करता येणार नाही आणि कामाची मुदत जुलै २०१८ पर्यंत आहे. मागील दोन वर्षांत हेडवर्क्सचे काम करण्यास अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी लवकरात लवकर कमी करून मिळण्यासाठी आवर्तन लवकर सोडण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याची सूचना आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांना केली. त्यानंतर, आयुक्तांनी मुंबई महामार्गालगत सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामाचीही पाहणी केली.  राजूरफाटा, वाडीवºहे, रायगडनगर, जैन मंदिर या भागात सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. आतापर्यंत १६ कि.मी.पैकी ११ कि.मी. काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.  सदर पाइपलाइन ही मुकणे धरणातील हेडवर्क्सपासून ते पाथर्डी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येत आहे. उर्वरित कामेही तातडीने मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

टॅग्स :DamधरणWaterपाणी