शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दत्त चौक भागात पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:09 IST

येथील दत्त चौक भागासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिडको : येथील दत्त चौक भागासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नाशिक शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील काही भागांत नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.दोन दिवसांपूर्वी खुटवडनगर भागातील मनपाचा जलकुंभ ओव्हरफ्लो होऊन यातून हजारो लिटर पाणी वाया गेले तर दुसरीकडे सिडकोतील दत्त चौक, विजयनगर या भागांत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गाने मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पिण्यापुरताही पाणी मिळत नसल्याने याबाबत पाणीपुरवठा विभागाचाच दोेष असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पाणी येत नसल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे महिलांनी तक्रार केल्यानंतर शहाणे यांनी स्वखर्चाने टॅँकरद्वारे प्रभागात पाणीपुरवठा केला. मे महिना असल्याने आधीच उकाड्याने हैराण झालेले असताना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना दूरवर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सिडकोतील दत्त चौक, विजयनगर, महाकाली चौक व परिसरातील पाणीपुरवठा मनपाने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.काही ठिकाणी पाण्याचा अपव्ययसिडको भागात काही ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकही पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करताना दिसून येतात. सकाळच्या सुमारास फेरफटका मारला असता बहुतांशी भागातील गल्लीबोळातील रस्त्यांवर पाण्याचा सडा मारलेला असतो, तर हौद तसेच पाण्याची साधणे भरून पाणी वाया जात असतानाही नळ बंद करीत नसल्याचे चित्र बघावयास मिळते. एकूणत मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोत काही भागांत पाणीच पाणी, तर काही भागांत मात्र पाण्याची भीषण टंचाई जाणवताना दिसून येते.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी