शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणचे कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:08 IST

कोरोनाचा मुकाबला करताना शासनाने सर्वच प्रकारच्या अतिरीक्त खर्चावर बंधने आणली असून, अनेक खात्यांसाठी यापुर्वी करण्यात आलेली तरतूद परत मागविली तर काही योजनांना शासनानेच कात्री लावली.

ठळक मुद्देजलसंधारण विभागाच्या कर्मचा-यांचे मार्च महिन्यांपर्यंतचे वेतन नियमित सुरू होते.

नाशिक :  पाणी साठवणूक व तलाव, बंधारे दुरूस्तीचे कामे करणाऱ्या जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन झाले नसून, त्यामुळे कर्मचाºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून कर्मचाºयांच्या वेतनासाठी जलसंधारण विभागाला     दोन महिन्यांपासून अनुदानच दिले नसल्याने राज्यातील सर्व जिल्'ातील कर्मचारी पगारापासून वंचित राहिले आहेत.

कोरोनाचा मुकाबला करताना शासनाने सर्वच प्रकारच्या अतिरीक्त खर्चावर बंधने आणली असून, अनेक खात्यांसाठी यापुर्वी करण्यात आलेली तरतूद परत मागविली तर काही योजनांना शासनानेच कात्री लावली. राज्यापुढे असलेले आर्थिक संकट पाहता कर्मचारी, अधिकाºयांचे वेतन देखील दोन टप्प्यात करण्याचे ठरविले होते. मात्र कोणत्याही विभागाच्या कर्मचारी, अधिका-यांचे वेतन मात्र थांबविले नाही. अशी परिस्थिती असतानाही जलसंधारण विभागाच्या कर्मचा-यांचे मार्च महिन्यांपर्यंतचे वेतन नियमित सुरू होते. त्यानंतर मात्र एप्रिल व मे अशा दोन महिन्यांचे वेतन जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत होऊ शकलेले नाही. या संदर्भात स्थानिक पातळीवरून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला परंतु त्याला शासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यातून लॉकडाऊन सुरू असताना वेतन न मिळाल्याने कर्मचा-यांपुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अनेक कर्मचा-यांवर बॅँकाचे कर्ज असून, त्यांचे हप्ते नियमित दरमहा पगारातून कपात केले जात असल्याने ते भरण्यास असमर्थ ठरलेल्या कर्मचा-यांना दंड भरावा लागत आहे. तर काहींना औषधोपचारासाठी देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत.नाशिक जिल्हा परिषदेत जलसंधारण विभागाच्या अंतर्गंत लघु पाटबंधारे पुर्व व पश्चिम विभाग असून, या विभागात जिल्'ात जवळपास दिडशे ते दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. तर राज्यात ही संख्या हजारोंच्या आसपास आहे. शासनाने लवकरात लवकर कर्मचा-यांचे वेतन करावे अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद