शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाचवा संदेश उपक्रम प्रेरणादायी : सागरानंद स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:11 IST

कालभैरवनाथ कावडयात्रेतून पाणी वाचवा हा संदेश देण्याचा वडनेरकरांचा उपक्र म इतरांना प्रेरणादायी आहे. धार्मिकता डोळसपणे जोपासत सामाजिक उपक्र म राबविल्यास समाज व धर्म यांचे कल्याण होते. कावडयात्रेतून एकसंधपणा व सहकार्य वृत्ती वाढीस लागते. धर्म कधीच वाईट शिकवत नाही, असे मत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत सागरानंद स्वामी यांनी कालभैरवनाथ कावडयात्रा शुभारंभ करताना व्यक्त केले.

वडनेरभैरव : कालभैरवनाथ कावडयात्रेतून पाणी वाचवा हा संदेश देण्याचा वडनेरकरांचा उपक्र म इतरांना प्रेरणादायी आहे. धार्मिकता डोळसपणे जोपासत सामाजिक उपक्र म राबविल्यास समाज व धर्म यांचे कल्याण होते. कावडयात्रेतून एकसंधपणा व सहकार्य वृत्ती वाढीस लागते. धर्म कधीच वाईट शिकवत नाही, असे मत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत सागरानंद स्वामी यांनी कालभैर वनाथ कावडयात्रा शुभारंभ करताना व्यक्त केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर होते. ‘आम्ही वडनेरकर’च्या वतीने वडनेरभैरवचे ग्रामदैवत कालभैरवनाथ जोगेश्वरीमाता यात्रोत्सवाच्या घटस्थापनेनिमित्त युवावर्गाच्या वतीने त्र्यंबक ते वडनेरभैरव अशी कावड पदयात्रा काढण्यात येत असते.  त्र्यंबक येथील म्हाळसामाता मंदिर परिसरात गंगाजल आणून त्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जलपूजन सागरानंद यांच्या हस्ते, तर भैरवनाथ प्रतिमापूजन नगरसेवक विष्णू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष गायधनी, शिल्पकार मानसिंह ढोमसे उपस्थित होते.  यावेळी त्र्यंबकच्या मुख्य रस्त्यावरून सजविलेल्या रथातून गंगाजल कावडयात्रा मिरवणूक काढण्यात आली. जय मल्हार वाघे मंडळ यांनी भैरवनाथांची गाणी म्हटली. सागरानंद महाराज यांचा सत्कार योगेश निखाडे यांनी, नगराध्यक्ष लोहगावकर यांचा सत्कार आबा पवार यांनी, गायधनी यांचा सत्कार दिलीप भालेराव यांनी, तर नगरसेवक धोबडे यांचा सत्कार नितीन कोपरे यांनी केला. सागरानंद स्वामी, लोहगावकर यांनी पाणी वाचविण्यासाठी व जनजा गृतीसाठी कावडयात्रा उपक्र माचे भाषणात स्वागत केले. कालभैरवनाथ यांना या पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणी