शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

कारसुळ नारायण टेंभीच्या पुलावरून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 20:48 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.

ठळक मुद्देदोन गावाचा संपर्क तुटला : अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.पुलावरून पाणी गेल्यास शेतक-यांना शेतात जाता येत नाही. विद्यार्थ्यांची शाळेला दांडी पडते तर अनेकांचा रोजगार बुडतो. पुलाची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार तक्र ारी करूनही त्याची योग्य दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात या पुलावरून ये-जा करणारी व प्रवासाचे प्रमुख माध्यम असलेली एसटी बस कारसुळ गावात येते पण पुलावरून पाणी असल्याने नारायण टेम्भी येथील गावकर्यांना बसची सेवाही खंडीत होते. या दोन्ही गावात पराशरी व काजळी या नद्यांचे संगम होऊन त्या तिसर्या कादवा नदीला मिळतात यामुळे तीन नद्यांचे संगम असलेले हे दोन्ही गावांमध्ये पावसाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या नद्यांना जलप्रवाहाला पावसात मोठा वेग असतो. मुसळधार पाऊस झाल्यास पुलावरून पाणी जाते. त्यामुळे पुलाशी जोडलेल्या या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो.काजळी नदीवरील हा पूल जुना आहे. मो-यांवर हा पूल बांधण्यात आला आहे. नदीच्या पाण्यातून केवळ पाच फूट उंचीवर हा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलालगतच पाणी जाते. पुलाच्या टोकाजवळ रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने रस्ता खड्डयÞांत गेला आहे. पूलही ठिकठिकाणी खचला आहे. माध्यमिक शाळा कारसुळ या गावी असल्याने नारायण टेम्भी येथील शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून शैक्षणकि नुकसान होऊ नये म्हणून या पुलावर जावे लागते .त्यामुळे पाणी वाढून कधीही मोठी हानी होईल , अशी भिती आहे. या बाबत नारायण टेंभी येथील सरपंच अजय गवळी यांनी वेळीवेळी ग्रामसभेत ठराव केला होता. व नवा पूल बांधून द्यावा, अशी मागणी केली होती. नारायण टेम्भी येथील शाळेत जाणार्या मुलांच्या ऊंच्या वाढल्या पण या दोन्ही गावांना जोडणार्या या नदीवरील पुलाची उंची काही वाढली नाहीमात्र संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनाचा जीव गेल्यावरच या विभागाला जाग येतेकी काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे.कोट....आमदार खासदार यांना वेळोवेळी सांगूनही या नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही आजपर्यंत फक्त येथील विद्यार्थी ,ग्रामस्थ व शेतकर्यांना आश्वासन मिळाले पण आता नविनर्वाचित आमदारांकडू या दोन्ही गावांना जोडणार्या पुलाची उंची वाढेल अशी नकीच अपेक्षा आहे- अजय गवळी,नारायण टेम्भी सरपंच 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी