संवेदनशील निर्देशांक या दोन शब्दांना एकत्र करून सन १९८९ मध्ये बाजार विश्लेषक दीपक मोहोनी यांनी सेन्सेक्स ही नवीन संज्ञा तयार केली आणि आता याच नावाने हा निर्देशांक ओळखला जात आहे.
या निर्देशांकामध्ये असलेल्या ३० कंपन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन वेळोवेळी बदल केले जातात. बदलत्या परिस्थितीमध्ये ज्या नवीन कंपन्या चांगली कामगिरी करीत असतात, त्यांना या यादीमध्ये सामील केले जाते. तसेच ज्यांची कामगिरी खराब होते, त्या कंपन्यांना डच्चू मिळत असतो.