शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक समाजाकडून सहकुटुंब जेलभरो आंदोलनाचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 17:51 IST

नाभिक समाजातील अनेक कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यामुळे राज्यशासनाने इतर व्यावसायिकांप्रमाणे सलुन व्यवसाय सुरु करण्यास १५ जुनपर्यंत परवानगी द्यावी, अन्यथा  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने  राज्यसरकारचा जाहीर निषेध करुन नाभिक समाज कुंटूबासह जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देसलुन दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळावीराज्यातील नाभिक समाजाची सरकारकडे मागणी परवानगी न मिळाल्यास सहकुटुंब जेलभरोचा इशारा

नाशिक : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे राज्यभरात नाभिक समाजाच्या पारंपारिक व्यवसायावर गदा आली असुन अनेक कारागिरांची उपासमार सुरु झाली आहे.  राज्यशासनाने इतर व्यावसायिकांप्रमाणे सलुन व्यवसाय सुरु करण्यास १५ जुनपर्यंत परवानगी द्यावी, अन्यथा  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने  राज्यसरकारचा जाहीर निषेध करुन नाभिक समाज कुंटूबासह जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. लाँकडाऊन काळात नाभिक समाजाने सलुन दुकाने बंद ठेवुन राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. राज्य शासनाने वर्गवारी केलेल्या जिल्ह्यामध्ये ग्रीन झोन मध्ये इतर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र त्यानंतरही कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतांनाच इतर व्यवसायांना सुरु करण्यासाठी परवानगी दिली. सध्या २३ मार्चपासुन ते ८ जुनपर्यंत जिल्ह्यातील सर्व सलुन बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नाभिक समाजातील अनेक कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यातच विविध शाळा, महाविद्यालयामधुन पुस्तके खरेदीचे सांगितले जात आहे. दुकाने बंद असतांनाही विजेचे अव्वाच्या सव्वा बील येत आहे. त्यामुळे नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती पुर्णपणे ढासळली आहे. तसेच जोपर्यंत सलुन दुकाने सुरु होत नाही तोपर्यंत नाभिक बांधवाना उपाशीपोटी रहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचा संपुर्ण नाभिक बांधवाकडुन निषेध करण्यात येत असल्याच नाभिक समाच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे १५ जुनपासुन सलुन दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी अन्यथा कुंटूबासह जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील नाभिक बांधवासह नारायण यादव, संजय गायकवाड, अरुण सैंदाणे, ज्ञानेश्वर बोराडे, नाना वाघ, संतोष रायकर, संतोष वाघ आदींनी दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकHair Care Tipsकेसांची काळजी