शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

राज्यात ‘वॉर्ड क्लिनिक’योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:12 IST

तळागाळातील माणसाला वैद्यकीय सेवा मिळावी. वैद्यकीय उपचाराअभावी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकार महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत.

नाशिक : तळागाळातील माणसाला वैद्यकीय सेवा मिळावी. वैद्यकीय उपचाराअभावी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकार महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच दिल्लीच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर राज्यभरात ‘वॉर्ड क्लिनिक’योजना राबविली जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ या आरोग्य विभागाच्या अभियानांतर्गत जिल्हा सरकारी रु ग्णालयात आयोजित मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सोमवारी (दि.२६) करण्यात आले. यावेळी भुसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी, आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण समितीचे सभापती यतिन पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. भुसे यांनी ‘बेटी बचाव’ या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीसाठी केस पेपरवर स्टॅम्प उमटवून ‘जनजागृती स्टॅम्प’चे अनावरण केले. यावेळी भुसे म्हणाले, लाभार्थी रु ग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात कुठल्याही आजाराचा रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये म्हणून वैद्यकीय चमुने प्रयत्नशील रहावे. महाशिबिराअंतर्गत नोंदणी करणाऱ्या रुग्णांच्या उपचारापर्यंत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करावे, असे मांढरे म्हणाले.९० डॉक्टरांचा चमू; दोन हजार रुग्णांची ‘ओपीडी’जिल्हा रु ग्णालयात मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १६ जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारे महाआरोग्य शिबिर राबविले जात आहे. रुग्णांची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत केले जाणार आहे. प्रत्येक विभागामध्ये सात ते आठ विशेष डॉक्टरांचे पथक वैद्यकीय सेवा देणार आहेत. दिवसभरात दोन हजार ४७१ विविध रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.लाभार्थी रुग्णसंख्या अशी...त्वचारोग : १६२कर्णविकार : १३५अस्थिरोग : ३१०स्त्री-रोग : १३७दंतविकार : १००नेत्रविकार : २४८बालरोग : १८१मानसिक आजार : ७४

टॅग्स :Healthआरोग्यministerमंत्री