शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

वंजारी समाजाचा मोर्चा : 'वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:28 IST

नाशिक : आरक्षण आमच्या हक्काचं..., वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...,एक वंजारी, लाख वंजारी...अशा घोषणा देत हजारो वंजारी समाजबांधव हातात भगवे ध्वज ...

ठळक मुद्दे'आम्ही वंजारी'अशी ओळख सांगणारी डोक्यावर गांधी टोपी वंजारी समाजबांधव वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर

नाशिक : आरक्षण आमच्या हक्काचं..., वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...,एक वंजारी, लाख वंजारी...अशा घोषणा देत हजारो वंजारी समाजबांधव हातात भगवे ध्वज अन् डोक्यावर 'आम्ही वंजारी'अशी ओळख सांगणारी गांधी टोपी घालून वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.११) रस्त्यावर उतरले.क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक आरक्षण कृती समिती, वंजारी समाज या संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय मोर्चा बुधवारी शहरातून काढण्यात आला. राज्यात वंजारी समाजाचा समावेश एनटी-ड या वर्गवारीत करण्यात आला. ११ टक्क्यांपैकी समाजाला केवळ २ टक्के आरक्षण दिले गेले. समाजाची लोकसंख्या बघता हे आरक्षण अत्यंत तोकडे असल्याचे सांगत वाढीव आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील वंजारी समाज एकवटला. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने एकत्र येऊन शहरातील गंगापूररोडवरील नाईक महाविद्यालयातून मोर्चा काढण्यात आला. प्रत्येकाने हातात भगवा ध्वज,वाढीव आरक्षणाच्या मागणीचे फलक घेत मोर्चात सहभाग नोंदविला. पावसाच्या हलक्या सरींच्या वर्षावात भिजत हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी टाळकरी ज्येष्ठ नागरिकांचा चमू संचलन करत होता. त्यापाठीमागे महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला, तरूण कार्यकर्ते या क्रमाने मोर्चेकऱ्यांनी गंगापूररोड, कॅ नडा कॉर्नर, शरणपूररोडवरून टिळकवाडी, पंडीत कॉलनीमार्गे पुन्हा जुन्या गंगापूर नाक्यावरून नाईक महाविद्यालयापर्यंत मार्गक्रमण क रत परिसरत दणाणून सोडला. दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना वंजारी समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.---इन्फो--अशा आहेत मागण्यावंजारी समाजास (एनटी-ड प्रवर्ग) ७ टक्के वाढवून एनटीसाठी सरसकट आरक्षण द्यावे.राज्यातील वंजारी समाजाची जनगणना करून ती तातडीने जाहीर करावीसमाजातील मुलामुलींसाठी जिल्हानिहाय वसतीगृहांची उभारणी करावीनॉनक्रिम्रिलेयर प्रमाणपत्राची अट रद्द करावीसारथी, बार्टीच्या धर्तीवर एनटीडी योजना राबवावीउद्योग, व्यवसायांसाठी विना व्याज क र्ज उपलब्ध करून द्यावेपरदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करावीराज्यस्तरावर नाईक महामंडळाची स्थापना करावीहभप वामन भाऊ सोनवणे यांना राष्टÑसंताचा दर्जा द्यावा.--

 

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चाGopinath Mundeगोपीनाथ मुंडेreservationआरक्षण