वणी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:02 AM2020-01-10T00:02:03+5:302020-01-10T00:02:28+5:30

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. सोनजांब येथे वणी, राजारामनगर शाळांच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक दत्तात्रेय पाटील होते.

Wani College's labor reception camp | वणी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

वणी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिर कार्यक्रमात बोलताना नीलिमा पवार. समवेत दत्तात्रय पाटील, श्रीराम शेटे, शिवाजीराव बस्ते, लक्ष्मणराव महाडिक, भास्कर भगरे आदी.

Next

दिंडोरी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. सोनजांब येथे वणी, राजारामनगर शाळांच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक दत्तात्रेय पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, संचालक शिवाजीराव बस्ते, प्राचार्य लक्ष्मणराव महाडिक, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, सोनजांबच्या सरपंच सुनीता जाधव, उपसरपंच प्रभाकर जाधव, वसंतराव कावळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. प्रदीप नवले यांनी अहवाल वाचन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. मनोगत प्राचार्य डॉ. डी. एन. कारे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्र म अधिकारी डॉ. एस. एस. प्रसाद, प्रा. प्रदीप नवले, प्रा. विकास शिंदे, प्रा. प्रवीण ढेपले, प्रा. कैलास सलादे, प्रा. छाया लबडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पंकज गांगुर्डे यांनी केले. आभार प्राचार्य आर. टी. जाधव यांनी मानले.

Web Title: Wani College's labor reception camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.