शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी जनावरांची भटकंती

By admin | Updated: May 12, 2016 00:41 IST

पाण्यासाठी जनावरांची भटकंती

लक्ष्मण सोनवणे ल्ल बेलगाव कुऱ्हेइगतपुरी तालुक्यात दुष्काळाची कोरडी छाया नागरिकांची तडफड वाढवत आहे. दुष्काळी परिस्थितीने आता भयंकर पाय पसरले आहेत. पाण्याचा ठणठणात जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आल्याने दुष्काळ आता त्यांचा वैरी होऊन बसला आहे.तालुक्यातील १२६ महसुली गावांत एकूण पशुधनाची संख्या जास्त आहे. गायी ४४ हजार २९० आहेत, तर म्हैस- २२ हजार ९११, शेळ्या० १९ हजार ४२७, मेंढ्या- ४०, घोडे- ४९, कोंबड्या- ३९ हजार ५७३ आहेत. त्यात शेळ्या, मेंढ्या, म्हैस आदि जनावरे पशुपालकांनी पाळलेली आहेत. त्यांच्यासाठी चारा व पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याचे भयाण चित्र दिसत आहे. याबरोबरच वन्यप्राण्यांवरदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनादेखील दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे. तालुक्यात चाराटंचाईमुळे शेतकरी दुचाकीवरून मिळेल त्या ठिकाणावरून चारा विकत आणत आहेत. काही शेतकरी १६०० रुपये ट्रॅक्टरप्रमाणे गवत विकत घेतात, तर पैशाअभावी तेही मोजक्या शेतकऱ्यांना गवत घेता येते.प्रत्येक वर्षी निसर्ग बदलत असल्याने उष्णता वाढत आहे. तालुक्यातील तपमान ४० अंश किंवा त्याहून अधिकच आहे. त्या तुलनेत पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्ष चांगले होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाला आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. इगतपुरी तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाई यावर चर्चा, बैठका, नियोजन अजूनही झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. पाणीबचतीसाठी कठोर धोरण अवलंबावे लागणार आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर केवळ आता वरवरचे उपाय करून भागणार नाही, तर कायमस्वरूपी एखाद्या योजनेची गरज आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे व तो जमिनीत जिरविण्यासह कूपनलिका खोदून जमिनीची होणारी चाळण थांबवावी लागेल. असे उपाय केल्याशिवाय दुष्काळावर मात करणे शक्य होणार नाही.