शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

गुदामांच्या शोधासाठी नाशिक जिल्ह्यातील तहसिलदारांवर भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:18 PM

खुल्या बाजारात मक्याचे भाव अकराशे ते बाराशे रूपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शासनाने यंदाही आधारभुत किंमतीत १४२५ रूपये दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या जिल्ह्यात मक्याचे उत्पादन घेतले जाते त्याठिकाणी जिल्हा मार्केट फेडरेशनच्यावतीने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते.

ठळक मुद्देमका खरेदी केंद्रे : शासनाच्या आदेशानंतरही खरेदी रखडली

नाशिक : जिल्ह्यात दहा केंद्रावर आधारभुत किंमतीत मका खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केट फेडरेशनने तयारी पुर्ण केली असली तरी, दहापैकी एकाही तालुक्यात खरेदी केलेला मका साठवणूक करण्यासाठी तहसिलदारांकडून गुदाम मिळत नसल्याने शासन आदेशानंतरही जिल्ह्यात मका खरेदी सुरू होऊ शकली नाही, दुसरीकडे शासकीय गुदामे धान्याने हाऊस फुल्ल असल्यामुळे खासगी गुदामांच्या शोधासाठी तहसिलदारांना भटकंती करावी लागत आहे.खुल्या बाजारात मक्याचे भाव अकराशे ते बाराशे रूपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शासनाने यंदाही आधारभुत किंमतीत १४२५ रूपये दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या जिल्ह्यात मक्याचे उत्पादन घेतले जाते त्याठिकाणी जिल्हा मार्केट फेडरेशनच्यावतीने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. कोणत्या तालुक्यात मका खरेदी केंद्रे सुरू करायचे याबाबतचे अधिकार जिल्हा पुरवठा अधिका-यांना देण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यात मालेगाव, देवळा, कळवण, सटाणा, चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर, दिंडोरी, निफाड या दहा तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. तसे पत्र मार्केट फेडरेशनला देण्यात आले, मात्र मका खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणा-या मक्याची साठवण करण्यासाठी गुदाम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुक्यातील तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, खरीपात घेण्यात आलेला मका काढण्यास शेतक-यांनी सुरूवात केली असून, सध्या खळ्यावर पडून असलेला हा मका कडक उन्हामुळे सुकून त्याचे वजन कमी होऊ लागले आहे तर अधून मधून अवकाळी पाऊसही हजेरी लावत असल्याने तो खराब होण्याची भितीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतक-यांकडून आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मात्र खरेदी केलेला मका साठवण्याची मोठा प्रश्न फेडरेशन व तहसिलदारांपुढे उभा ठाकला आहे. पुरवठा खात्याने मक्यासाठी खासगी गुदामे भाड्याने घेण्याची तयारीही दर्शविली आहे, परंतु जिल्ह्यात गुदामे मिळत नसल्याचे तहसिलदारांचे म्हणणे आहे. एकीकडे फेडरेशन व दुसरीकडे शेतक-यांचा दबावामुळे तहसिलदारांना महत्वाचे कामे सोडून गुदामे शोधण्यासाठी गावोगावी भटकावे लागत आहे. काही ठिकाणी गुदामे असली तरी, त्यांची अवस्था अतिशय बिकट असून, त्याची डागडुजी करण्यातच वेळ व पैसा खर्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदवड व येवला या दोन तालुक्यात गुदामे मिळाल्याने येत्या दोन दिवसात केंद्रे सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :collectorतहसीलदारagricultureशेती