सटाणा : वाळू तस्करी विरोधी कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी फावड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि.२२) पहाटे बागलाण तालुक्यातील खमताणे येथे घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी दोन जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यात यंदा अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे .बेसुमार वाळू उपशामुळे यंदा मोसम ,हत्ती ,आरम, कान्हेरी , करंजाडी नदीपात्रातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. या पाशर््वभूमीवर बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी पहाटे महसूलचे पथक खमताणे येथील आरम नदीपाात्रात गस्तीवर असतांना जीवन इंगळे ,पवन इंगळे हे दोघे बंधू सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरवर वाळूची चोरटी वाहतूक करतांना आढळून आले. यावेळी पथकातील मेजर मच्छिंद्र मोरे, मंडळ अधिकारी अहिरे यांनी ट्रक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता इंगळे बंधूंनी अर्वाच्च शिवीगाळ करून फावड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला .त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन इंगळे बंधू ट्रॅक्टर घेऊन पसार झाले .याप्रकरणी मेजर मोरे यांनी सटाणा पोलिसात तक्र ार दिल्याने पोलिसांनी इंगळे बंधूंविरु द्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे.
वाळूमाफियांचा गस्ती पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:23 IST
आरम नदीपात्रातील घटना : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वाळूमाफियांचा गस्ती पथकावर हल्ला
ठळक मुद्देबेसुमार वाळू उपशामुळे यंदा मोसम ,हत्ती ,आरम, कान्हेरी , करंजाडी नदीपात्रातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत