शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारेत उभी राहिली माणूसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

नाशिक तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे गावात माणूसकीचे भिंत उभी करण्यात आली असून, यात गावातील गरीब व गरजूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व महिला, पुरुष, मुलांसाठीचे वापरलेले जुने कपडे एका भिंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गावातील तरुणांनी याकामी पुढाकार घेऊन, परिसरातील गरीब व गरजवंत यांनी आपल्या मापाचे जुने कपडे घेऊन जात आहेत.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे गावात माणूसकीचे भिंत उभी करण्यात आली असून, यात गावातील गरीब व गरजूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व महिला, पुरुष, मुलांसाठीचे वापरलेले जुने कपडे एका भिंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गावातील तरुणांनी याकामी पुढाकार घेऊन, परिसरातील गरीब व गरजवंत यांनी आपल्या मापाचे जुने कपडे घेऊन जात आहेत.गिरणारे येथे मोठ्या प्रमाणावर आदिवासी खेड्यातून मजूर व कष्टकरी शेतीकामासाठी मुक्कामी १५ ते २० दिवस येत असतात. त्यांना कपड्यांची गरज भासते ही अडचण दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न नितीन गायकर व मित्रपरिवार यांनी केला. गावातून जवळपास १५०० ते २००० हजार कपडे संकलन करून या माणूसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरातील सर्व प्रकारचे विनावापर कपडे फेकून न देता ते माणूसकीच्या भिंतीवर आणून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी गावच्या सरपंच अलकाताई दिवे, निवृत्ती घुले, बाळकृष्ण हंडोरे, आत्माराम थेटे, मंजूळताई गायकर, छबाबाई थेटे, अंजना लिलके, प्रवीण कोरडे, सुभाष खैरनार, संजय सूर्यवंशी, शंकर थेटे आदी उपस्थित होते.गावातील काही तरुणांनी घराघरांत जाऊन नागरिकांकडून विनावापरत असलेल्या सर्व प्रकारचे कपडे गोळा करून गिरणारेच्या चौफुलीवर एक ‘माणूसकीची भिंत’ अशी पाटी लावून त्यावर जुने कपडे अडकविण्यात आले आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक