शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलसदृश ज्वलनशील द्रव्य ओतून वाजे यांना कारसह पेटविले मोटार नेली शहराबाहेर निर्जनस्थळी : पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 00:16 IST

नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे मंगळवारी (दि.२५) दुपारनंतर रुग्णालयात मोटारीने गेल्या; मात्र त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. शिजविलेल्या कटाप्रमाणे संशयित संदीप वाजे याने त्यांचा काटा काढला. निर्जनस्थळी त्यांना मोटारीतून घेऊन जात साथीदारांसोबत संगनमताने ठार मारुन मोटारीसह पेट्रोलसदृश्य ज्वलनशील द्रव्य ओतून पेटवून दिल्याच्या धक्कादायक प्रकारावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे मंगळवारी (दि.२५) दुपारनंतर रुग्णालयात मोटारीने गेल्या; मात्र त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. शिजविलेल्या कटाप्रमाणे संशयित संदीप वाजे याने त्यांचा काटा काढला. निर्जनस्थळी त्यांना मोटारीतून घेऊन जात साथीदारांसोबत संगनमताने ठार मारुन मोटारीसह पेट्रोलसदृश्य ज्वलनशील द्रव्य ओतून पेटवून दिल्याच्या धक्कादायक प्रकारावर अखेर शिक्कामोर्तब झाले.सुशिक्षित, उच्चभ्रू कुटुंब म्हणून कर्मयोगीनगर परिसरात ओळखल्या जाणाऱ्या वाजे दाम्पत्यामध्ये कलह पराकोटीला पोहोचला होता. बांधकाम व्यावसायिक असलेल्या संदीप वाजे याने पेशाने डॉक्टर असलेल्या स्वत:च्या पत्नीच्या खुनाचा पूर्वनियोजित कट रचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाजे यांची जळालेली मोटार व त्यामध्ये सापडलेली हाडे शहरापासून कोसोदूर आढळली. मुंबई महामार्गालगत लष्करी फायरिंग रेंजच्या प्रवेशद्वारासमोर जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. या घटनेनंतर विविध प्रश्न उपस्थित झाले होते.रासायनिक विश्लेषकाकडून मागविला अहवालवाजे यांची मोटार हेतूपुरस्सर जाळण्यात आल्याचे अग्नी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. रासायनिक विश्लेषकामार्फत पोलिसांकडून जळालेल्या अवशेषाचे नमुने पडताळणी करून घेतले जात आहेत. अद्याप रासायनिक विश्लेषकांचा अहवाल आलेला नाही. मोटार जाळण्यासाठी रासायनिक द्रव्यांचाही वापर केला गेला किंवा नाही? हे स्पष्ट होणार आहे.कलह घटस्फोटापर्यंतही पोहोचला होतामागील काही वर्षांपासून वाजे दाम्पत्यामध्ये होणारा वादविवाद व कलह घटस्फोटापर्यंतही जाऊन पोहोचला होता, असेही पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. साक्षीदारांची नोंदविलेली साक्ष, तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेले पुरावे, डीएनए चाचणी अहवाल आदींवरून पोलिसांनी अखेर वाजे बेपत्ता झाल्या नसून, त्यांचा खून करण्यात आला असल्याचे कळले.खुनाचे पुरावे जाळले खरे, पण....?संशयित संदीप वाजे याने संगनमताने काही साथीदारांच्या मदतीने स्वत:ची पत्नी सुवर्णा वाजे यांना ठार मारले. त्यांच्या खुनाचे सर्व पुरावे नष्ट व्हावेत आणि पोलिसांच्या तपासाला दिशा मिळू नये, म्हणून मोटारीसह वाजेंचा मृतदेह पेटवून दिला. या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करत ग्रामीण पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक