शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तळवाडेला पाण्याच्या टॅँकरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 17:04 IST

प्रस्ताव सादर : प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थ संतप्त

ठळक मुद्देसात दिवस होऊनही गावात पाणी मिळत नाही, एक थेंब पाणी मिळत नसल्याने शिवारात अनेक कोस महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे गावात पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरु करावा यासाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून पंधरा दिवस उलटून गेले आहे तरी प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने गावातील महिलांनी अखेर निफाड तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच लता सांगळे यांनी दिली आहे.तळवाडे ग्रामपंचायतीने ४ मे रोजी टँकर सुरु करावा यासाठी निफाड पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर गावातील बोअरवेल ,विहीर अधिग्रहण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. परंतु, केवळ पाच दिवस पाणी पुरेल असे पत्र ग्रामपंचायतीने सादर केले. ९ मे पर्यंत गावातील विहिरीचे पाणी पुरले,त्यानंतर एक बोअरवेल घेतले परंतु पाण्याचा थेंबही लागला नाही. सात दिवस होऊनही गावात पाणी मिळत नाही, एक थेंब पाणी मिळत नसल्याने शिवारात अनेक कोस महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात तात्काळ टँकर सुरु झाला नाही तर गावातील महिलांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता न्यायालय, मंत्रिमंडळाने अनेक अटी शिथिल करून नागरिकांना पाणी आणि जनावरांसाठी छावणी सुरु करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा प्रशासन देखील टँकरचे प्रस्ताव त्वरित मान्य करून नागरिकांना पिण्याचे पाणी तात्काळ मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात प्रस्तावास मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत आहे. एकीकडे दुष्काळाशी सामना करण्यासाठी सरकार सज्ज असतांना निफाड तालुका मात्र टॅँकरच्या प्रतीक्षेत असल्याचे सरपंच लता सांगळे यांनी म्हटले आहे.गावात पाण्याचा थेंब नाहीगावात पाणी टँकर सुरु करावा , असा प्रस्ताव पंचायत समितीत सादर केला परंतु, अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. आठ दिवस झाले. गावात पाण्याचा थेंब नाही. सरकार एकीकडे मागेल त्याला टँकर देण्याची घोषणा करते, आचार संहिता शिथिल करते पण तालुका प्रशासन पाण्याचा टँकर सुरु करत नाही. ही खेदजनक बाब आहे.- लता सांगळे, सरपंच, तळवाडे

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी