शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा : नाशिकच्या 'ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ला हवा नागपूरचा ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 13:45 IST

नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपुर्वी तयार करुन नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले.

ठळक मुद्देदवाखाना या केंद्रात चालविला जाणार ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या हालचाली नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपुर्वी प्रस्ताव व आराखडा तयार

नाशिक : शहर व परिसरात एखादा दुर्मीळ पक्षी किंवा संरक्षित सूचीमधील वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. अनेकदा काही पक्षी, प्राणिमित्रांची यासाठी मदत घेतली जाते; मात्र त्यास फारसे समाधानकारक यश मिळते, असे नाही. जखमी वन्यजिवांसह पक्ष्यांवर शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या; मात्र ५ महिने उलटूनदेखील अद्याप जागानिश्चित करण्यापलीक डे कुठलेही पाऊल वनविभागाकडून टाकण्यात आलेले नाही.

विविध अपघातांमध्ये जखमी झालेले दुर्मीळ प्राणी, पक्षी तसेच तस्करीच्या उद्देशाने आणलेले वन्यजीव रेस्क्यू केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याअगोदर त्यांच्यावर औषधोपचार करणे गरजेचे ठरते. त्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाने ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारणीचा प्रस्ताव नागपूर येथील प्रधान वनसंरक्षक कार्यालय वन्यजीव विभागाकडे पाठविण्यात येणार होता. त्यादृष्टीने तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावाचा प्रवास नाशिक ते नागपूर असा कधी होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे नाशिकला ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. सध्या वन्यजिवांवर पश्चिम वनसंरक्षक कार्यालयातच उपचार केले जातात किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी हलविले जाते; मात्र उपचारानंतर शुश्रूषा करण्यासाठी वनविभाग पश्चिम कार्यालयांतर्गत ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याबाबत पश्चिम कार्यालयाने तत्परतेने पाठपुरावा करणे गरजेचे असल्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे.

नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या मंजूरीच्या प्रतिक्षेतगंगापूर रोपवाटिकांमधील जागेचा विचार ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ करण्यात आला आहे. येथे मोकळ्या जागेत वनविभाग सुमारे अडीच हजार चौरस फूट जागेत हे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव व आराखडा नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपुर्वी तयार करुन नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले.

‘कात्रज’च्या धर्तीवर असणार सुविधायेथील केंद्रामधील सोयीसुविधा, वैद्यकिय उपचारपध्दती, पशुवैद्यकिय डॉक्टर व त्यांचे सहायकांची संख्या, आवश्यक औषधे, पिंजऱ्यांची रचना आदि बाबी विचारात घेत निरिक्षण नोंदविण्यात आले. यानुसार प्रस्ताव तयार करताना सर्व आवश्यक बाबी व सोयीसुविधांचा अंतर्भाव त्यामध्ये करण्यात आला आहे. बिबट्या, माकड, सर्प, गिधाडासारखे पक्ष्यासांठी स्वतंत्र सुश्रूषा कक्ष उभारण्यात येणार आहे. वन्यजीवांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी लागणारा दवाखाना या केंद्रात चालविला जाणार असून सर्व प्रकारची आवश्यक साहित्याने केंद्र अद्ययावत राहणार आहे. कात्रज येथील केंद्राच्या धर्तीवर व त्यापेक्षाही दर्जेदार सुविधा पुरविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग