शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

परिपूर्ण पाणीयोजनेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:34 IST

चांदवड :  सातत्याने दुष्काळ चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पूजला आहे. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात होत नाही, मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त व्हायचा असेल तर ४४ गाव नळयोजना व ४२ गाव नळयोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासुद्धा परिपूर्ण असल्यास तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त होईल.

चांदवड (महेश गुजराथी ) सातत्याने दुष्काळ चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पूजला आहे. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात होत नाही, मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त व्हायचा असेल तर ४४ गाव नळयोजना व ४२ गाव नळयोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासुद्धा परिपूर्ण असल्यास तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त होईल.मागील वर्षी पावसाळ्यात बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच चांदवड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यात जाणवणारी टंचाई यंदा फारशी जाणवली नाही. तालुक्यातील बव्हंशी जलाशयांमध्ये जून महिना अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात खोकड तलाव, वागदर्डी धरणाबरोबरच राहुड, जांबुटके, केद्राई (खडकओझर), दरसवाडी या जलाशयांचा समावेश आहे. त्यामुळे एप्रिल व मे अखेर चांदवड तालुक्यात टंचाईचे चित्र फारसे जाणवले नाही.गेल्या वर्षी मे महिन्यात याच तारखेपर्यंत चांदवड तालुक्यात १२ गावे व ४६ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. दररोज १३ टॅँकरद्वारे ३५ फेºया मारण्यात येत होत्या. तर मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बºयाच गावातील विहिरी, बोअरवेल्स, जलसाठे कोरडेठाक पडल्याने व त्यापूर्वीच्या वर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यातुलनेत यंदा परिस्थिती बºयापैकी आहे.जलयुक्त शिवार योजनेची कामे चार वर्षांत चांगली झाल्याने यावर्षी पाहिजे तेवढी टंचाई जाणवत नसल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी दिली. त्यांच्या मते सद्यस्थितीत केद्राई (खडकओझर) व राहुड एम.आय. धरणात १० जूनपर्यंत पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध आहे, तर जांबुटके, दरसवाडी या धरणाची हीच परिस्थिती आहे. सद्यस्थितीत कोणत्याही गावातून पाणीटंचाईबाबत मागणी नाही किंवा तसा प्रस्तावही अद्यापपर्यंत नाही तथापि ग्रामपंचायतीमार्फत यापुढे प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याबाबत तातडीने उपाययोजना करून आवश्यकतेनुसार प्रथम विहीर अधिग्रहण किंवा टँकरबाबत उपाययोजना करण्यात येतील. तालुक्यातील सध्या एकाही गावाला सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. कोणत्या गावाची मागणी नाही, मात्र मे अखेर ही मागणी वाढण्याची शक्यता आहे.-----------------------कोरोनामुळे रखडली शहराची योजनामागील काळात पाणीटंचाई होती, मात्र चांदवड तालुक्यातील सुमारे ७२ गावांना आज तरी ओेझरखेड धरणावरुन पाणीपुरवठा होत आहे. आता तर चांदवड शहरासाठी गेल्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या रेट्यामुळे चांदवड शहरासाठी स्वतंत्र अशी ६८ कोटी रुपयांची पाणी योेजना मंजूर करुन दिली आहे. या योजनेचे काम प्रगतिपथावर असून, लॉकडाउनमुळे सदर योजना थांबली आहे, पण साधारण सप्टेंबर २०२० पर्यंत ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत अस्तित्वातील ४४ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे या उन्हाळ्यात अखेरपर्यंत शहराला व तालुक्यातील इतर गावांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.--------------------------------चांदवड तालुक्यातील एकूण ११२ गावांपैकी ओझरखेड धरणावरुन ६८ ते ७२ व नाग्यासाक्या धरणावरुन १६ अशा एकूण ८४ गावांना व वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान १६ गावांची योजना वीजबिल भरले नसल्याने बंद आहे. त्यावर लवकरच मार्ग निघेल. या दोन्ही योजनांमुळे चांदवड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवळण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षी व यंदाही जलयुक्त शिवारची कामे मार्गी लागल्याने व पाऊस चांगला झाल्याने टंचाई फारशी जाणवत नाही. तरीसुद्धा प्रमुख धरणातील पाणीसाठा उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत टिकावा यासाठी अवैध कनेक्शन बंद करणे, सिंगल फेज लाइन सुरू ठेवणे तसेच धरण परिसरामधील अवैध उपसा रोखण्यासाठी त्याचे काठावर पोकलेनने चर खोदणे यासारखे उपाय केले जात आहेत. टंचाईत मागणी आल्यास प्रथम विहीर अधिग्रहित करणे नंतर टॅँकरने पाणीपुरवठा केला जाईल.- प्रदीप पाटील, तहसीलदार चांदवड------------------------------------------------चांदवड तालुक्यातील ४२ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तालुक्यातील १६ गावे आहेत. वीजबिल थकल्यामुळे योजनेतून पाणीपुरवठा होत नाही. सुमारे दीड लाख रुपये थकीत आहे. हा प्रश्न लवकर मिटावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे तथापि मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे कोणत्याच गावात पाणीटंचाईबाबत समस्या सध्या तरी नाही. तर दरेगाव येथील सरपंच यांनी त्यांच्या स्तरावर स्थानिक विहिरीतून पाणीपुरवठा सुरू केलेला आहे.- महेश पाटील, गटविकास अधिकारी, चांदवड

टॅग्स :Nashikनाशिक