शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 14:09 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल २८ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत नव्याने समावेश करण्यात आल्यामुळे या गावांना जलसंजीवनीची मात्रा मिळणार असली तरी या कामांसाठी शासनाकडून भरीव निधीची प्रतीक्षा आहे.या अंतर्गत वनविकास व जलसंधारणाच्या कामांसाठी भरीव निधी मिळावा या मागणीसाठी अर्थ मंत्री सुधीर मुनगुट्टीवर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र ...

सटाणा : बागलाण तालुक्यात यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल २८ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत नव्याने समावेश करण्यात आल्यामुळे या गावांना जलसंजीवनीची मात्रा मिळणार असली तरी या कामांसाठी शासनाकडून भरीव निधीची प्रतीक्षा आहे.या अंतर्गत वनविकास व जलसंधारणाच्या कामांसाठी भरीव निधी मिळावा या मागणीसाठी अर्थ मंत्री सुधीर मुनगुट्टीवर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी निवेदन सादर करून साकडे घातले.पाणी टंचाईवर मत करण्यासाठी राज्य शासनाने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजना सुरु केली आहे.या योजनेत जलसंधारण अंतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनांद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आण िपिण्याचे पाणी उपलब्द्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला आहे. या अभियानात विविध विभागांकडील योजना ,अशासकीय संस्था आण िलोकसहभाग यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.गेल्या आर्थिक वर्षात बागलाण मधील एकवीस गावांचा या योजनेत समावेश होता.यंदाही बागलाणच्या सर्वाधिक २८ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे,या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वन ,कृषी ,जलसंपदा ,स्थानिक स्तर ,लघुपाटबंधारे या विभागाच्या अधिकार्यांनी कृती आराखडा तयार केला आहे.या कामांमुळे संबधित गावांना जलसंजीवनीची मात्रा मिळणार असली तरी या कामांना भरीव निधीची प्रतीक्षा आहे.--------------------योजनेत या गावांचा समावेश .....कौतिकपाडे ,मुळाणे,दर्हाणे,खमताणे ,नांदीन ,वाडीपिसोळ ,वडेखुर्द ,टिंगरी ,भवाडे,साळवन,कोदमाळ,पिसोरे ,तळवाडे दिगर ,तळवाडे भामेर ,सरवर,मळगाव खुर्द ,दोधेश्वर ,नळकस,लाडूद ,एकलहरे ,द्याने ,भिलवाड ,परशुरामनगर ,गौतमनगर ,महात्मा फुलेनगर ,वाघंबा ,रावेर ,भिमखेत या गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांना जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी भरीव निधी उपलब्द्ध करून द्यावा या मागणीसाठी राष्ट्रावादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी साकडे घातले.त्यांनी सादर केलेल्या निवेदनात बागलाण हा आदिवासी बहुल तालुका आहे.मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्यामुळे त्याच्या विकासासाठी वने आली जलसंधारणाची कामे घेतल्यास वाहून जाणारे पाणी अडवून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.त्यासाठी शासनाच्या ०७९७,६०११, ०८०३ या शीर्षखाली आदिवासी व बिगर आदिवासी भागातील कामांसाठी भरीव निधी मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक