शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

येवल्यातील शेतकऱ्यांना पालखेडच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 28, 2015 23:11 IST

दुष्काळ : रब्बीच्या पिकासाठी बळीराजाची धडपड

येवला :तालुक्याच्या दक्षिण पश्चिम पट्ट्यातील पालखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, ज्वारी या सारखी पिके जगविण्यासाठी कालव्याचे नियमित रब्बी आवर्तन सोडावे, अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे यांनी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे केली आहे. शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्यासह शेतकरी आता पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनासाठी सरसावले आहेत.तालुक्यातील ४८ हजार हेक्टर जमिनीला पालखेड कालव्याचे पाणी मिळते. त्यासाठी ८७ पाणी वापर सोसायट्या आहेत. मागील आठवड्यात पालकमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व धरण समूहाचे पाणी वाटप, आरक्षण जाहीर झाले; मात्र पालखेड पाणी वाटपाच्याबाबतीत पालकमंत्री, जलसंपदा खाते,लोकप्रतिनिधी यांनी मौन धारण केल्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. पालखेड धरण समूहातील पालखेड, करंजवण, वाघाड ही तिनही धरणे पुर्ण क्षमेतेने भरल्यास ८ हजार ५२४ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध होतो; मात्र यंदा अल्प पावसामुळे तीनही धरणाचा पाणीसाठा ५० टक्केपेक्षा कमी आहे. येवल्यातील शेतकऱ्यांना पुर्ण जाणीव आहे. तरीही आजमितीस ४ हजार २४४ दशलक्ष घनफूट इतका पाणी धरण समूहात शिल्लक असून त्यातून नियमित आवर्तनासोबत तालुक्यातील कालवा आणि वितरीका लगतचे बंधारे भरून द्यावेत अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे, ज्येष्ठ नेते तात्या लहरे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, संभाजी ब्रिगेडचे पडवळ यांच्यासह शेतकरी करीत आहे.पालखेड धरण समूहातील पाणी वाटप लवकरात लवकर जाहीर करावे व १५ डिसेंबर च्या आत आवर्तन मिळाले नाही तर उद्रेक होईल अशी स्थिती येवला तालुक्यात आहे. समूहातील सर्वात मोठ्या करंजवण धरणातील साठवण क्षमता ५ हजार ३७१ दशलक्ष घनफूट असली तरी आजमितीस धरणात केवळ २ हजार १२३ दशलक्ष घनफूट पाणी आहे. म्हणजे धरण ४० टक्केदेखील भरलेले नाही. त्याखालोखाल वाघाड धरणाची क्षमता २५०३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. केवळ १४९७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६० टक्के पाणी आहे. पालखेड धरणच मुळात छोटे आहे आहे आणि ७५९ दशलक्ष घनफूट आणि आजमितिस पाणी साठा आहे ६२४ दशलक्ष घनफूट आहे.एकूण धरण समूहाचा विचार करता ८५२४ दशलक्ष घनफूट संपूर्ण साठवण क्षमतेपैकी आजमितीस केवळ ४२४४ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा आहे. अर्थात फक्त ४९ टक्के सरासरी सर्व धरणे अर्धीही भरलेली नाहीत.येवला शहर, मनमाड शहर, मनमाड रेल्वे, पिंपळगाव बसवंत, ओझर आदि शहराना तसेच येवला तालुक्यातील ३८ गाव सारख्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नियमित २ आवर्तने देण्यात येणार असून शेतीसाठी पाणी दिल्यास येत्या मार्च, एप्रिल, मे, आणि जून महिन्यात पिण्यासाठीसुद्धा पाणी शिल्लक राहणार नाही असा तर्क लावला जात आहे.पालखेडच्या एका नियमित आवर्तनास ७५० दशलक्ष घनफूट पाणी लागते. येवला शहरासाठी दोन्ही तलावात किमान ५० दशलक्ष घनफूट पाणी, मनमाड शहरासाठी पाटोदा तलावातून ५१ दशलक्ष घनफूट पाणी, निफाड व विंचूर साठी १०० दशलक्ष घनफूट पाणी, रेल्वेसाठीचे ५० दशलक्ष घनफूट पाणी, ३८ गाव योजनेसाठी ४५ दशलक्ष घनफूट पाणी यासारख्या ३५० दशलक्ष घनफूट पाणी जर पोहोचवायचे असेल तर कमीत कमी ७०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडावे लागते. २५ टक्के वहन व्यय असून आणि शेतकऱ्यांद्वारे डोंगळेसह अनधिकृत पाणी उचलण्याचे प्रमाण फार मोठे आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्त, वीज बंद करणे, महसूल तसेच जलसंपदाचे शेकडो कर्मचारी रात्रंदिवस पहारा देऊनही शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे होणाऱ्या उपशाला नियंत्रणात आणणे अशक्य आहे. जलसंपदा खात्याला नियमित कराराची उद्दिष्ट्ये पूर्ण झाल्यावर पाणी उरल्यास शेतकऱ्यांना द्यायचेच असते. परंतु कालव्याच्या वरील बाजूस असणारे बलदंड बागायतदार शेतकरी येन-केनप्रकारे आपली मोठ मोठी शेततळी भरून घेत असतात. (वार्ताहर)