शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

By admin | Updated: July 7, 2017 00:03 IST

केवळ ११ टक्के वाटप : पैसे नसल्याने बॅँकांचे हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्याबरोबरच खरिपासाठी तत्काळ दहा हजार रुपये, तसेच हंगामासाठी हवे तेवढे कर्ज देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी, प्रत्यक्षात बॅँकांनी पैसे नसल्याचे कारण दाखवून शेतकऱ्यांना माघारी फिरविण्यातच धन्यता मानली आहे, परिणामी जुलै उजाडूनही जिल्ह्णात जेमतेम अकरा टक्के शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्णात खरिपाचे क्षेत्र जवळपास ६८६०८० हेक्टर इतके यंदा उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातही पुन्हा मान्सूनचे आगमन वेळेवर होऊन सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, परंतु नोटबंदीनंतर निर्माण झालेली बॅँकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होऊ लागला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्ज देण्याची घोषणा केली. शासनाची घोषणा होऊन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी, त्याची पूर्तता झालेली नाही. जिल्हा बॅँकेत खडखडाट असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले असल्याने त्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे शंभर कोटी रुपयांची मागणी केली, परंतु त्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवत शासनाने एक छदामही दिला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेचे दरवाजे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी अन्य बॅँकांचे उंबरे झिजविण्यास सुरुवात केली. परंतु सातबाऱ्यावर बोझा असल्यामुळे बॅँकांनी त्यांना माघारी पाठविले. सावकारीकडे वाटचालखरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून, बी-बियाणे तसेच खतांसाठी शेतकऱ्यांना आता पैशांची गरज आहे, परंतु बॅँका पीककर्ज देत नाहीत. शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असून, पैशांअभावी शेतकरी हंगाम वाया जाऊ देणार नाही त्यासाठी मिळेल त्या मार्गाने कर्ज घेण्यासाठी त्याला पुन्हा सावकाराकडे जाणे भाग पडणार आहे. जिल्ह्णात फक्त ११.४४ शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज कसेबसे हातात पडले आहे. प्रशासन मात्र बॅँकांच्या या साऱ्या परिस्थितीशी अवगत नसल्याने पीककर्ज घेण्यासाठी पात्र शेतकरी पुढे येत नसल्याने कर्जवाटप होत नसल्याचा सोयिस्कर अर्थ काढला आहे. बॅँकांची परिस्थिती योग्य असून, शेतकरीच कर्ज घेत नसल्याची परिस्थिती प्रशासन निर्माण करू पहात आहे.