नाशिक : दिवाळीमध्ये स्वस्त दरात रेशन कार्डवर मिळणारी साखर यंदा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. रेशन कार्डधारकांना अल्पदरात दिवाळीतील साखरेचा गोडवा मिळावा यासाठी पुरवठा विभागाकडून स्वस्त दरात साखर दिली जाते. मात्र अवघ्या पाच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली असतांनाही साखरेची मागणी नोंदविण्यात आलेली नाही. यामुळे दिवाळीमध्ये रेशनकार्डवर मिळणारी साखर मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाने मात्र नागरिकांना साखर मिळेल असा दावा केला आहे.
दिवाळीच्या साखरेची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 01:06 IST