नाशिक : सप्टेंबर २०१४ ते डिसेंबर २०१४ दरम्यान जिल्'ात चारवेळा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना द्यावयाची ७६ कोटींची नुकसानभरपाई पोटीची रक्कम शासनाकडे वारंवार मागूनही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून, जवळपास तीन वेळा शासनाकडे मागणी करूनही अद्याप प्रस्तावानुसार नुकसानभरपाईची रक्कम अद्याप अप्राप्त असल्याची कबुली दिली आहे. मागील वर्षी सप्टेंबरपासूनच गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्'ातील खरिपाचे व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विशेषत: काढणीला आलेल्या खरीप कांद्यासह द्राक्ष व डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुसार नुकसान झालेल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकांचे पंचनामे करून त्यानुसार कृषी विभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे नुकसानभरपाईपोटी निधीची मागणी केली होती. ५० टक्क््यांपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झालेल्या नुकसानभरपाईची महिनानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - सप्टेंबर २०१४- २४ कोटी ५० लाख, आॅक्टोबर २०१४- २ कोटी २० लाख, नोव्हेंबर २०१४- १८ कोटी ९३ लाख, डिसेंबर २०१४- ३१ कोटी अशी एकूण चार टप्प्यांत झालेल्या नुकसानभरपाई पोटीची ७६ कोेटी ६३ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. प्रत्यक्षात तीन वेळा या नुकसानभरपाईपोटी प्रस्ताव पाठवूनही अद्याप नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, खरिपाच्या हंगामात काय करावे? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ही नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत टंचाईसाठी १५० कोटींची मदत जिल्'ाला प्राप्त झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)
गारपीटग्रस्तांच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळेना शेतकरी हवालदिल : ७६ कोटींची प्रतीक्षा
By admin | Updated: February 5, 2015 22:51 IST