कंधाणे : मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठी मुळे हाजारो एकर बाधीत होवुन शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन बळीराजाला आर्थिक फटका बसला होता शासन स्तरावरून हयाची दखल घेत तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजित चार कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या एक महीन्यापासुन प्राप्त निधी मात्र कंधाणेतील नुकसान ग्रस्त बळीराजाच्या बँक खात्यात जमा झाला नसुन संबधित यंत्रणेच्या वेळेकाढूपणामुळे हा तोडकी मदतनिधी मृगजळ ठरू लागली आहे.कंधाणे परिसरात एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस व गारपीठीमुळे शेतातील काढणीला आलेला कांदा, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास निर्सगाच्या रूद्र अवतारामुळे हातचा जावुन शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. आधिच दुष्काळाने पीचत असलेल्या बळीराजाने दुष्काळाशी दोन हात करत उन्हाळी कांदा व भाजीपाला पिकाची लागवड केली होती. विजेचे वाढते भारनियमन, पाणीटंचाई, महागडी खते व बी बियाणे हे सर्व यइा पार करत कांदा पीक जतन केले होत,े पण अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नुकसान ग्रस्त शेतकºयांना शासनाने मदत जाहीर करून त्यांच्या दु:खावर फुंकर घातली होती. शासनाकडून गेल्या एक महीन्यापासुन संबधित महसुल विभागाकडे मदतनिधीचा धनादेश पाठविला असून महसुल विभागाकडून एका राष्ट्रीय कृत बँकेत खाते उघडून मदतनिधी जमा करून त्या बँकेला नुकसान ग्रस्त शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची जवाबदारी निश्चित केल्याचे वृत्त आहे. पण सदर बँकेकडून वेळकाढूपणा चालला असुन प्रत्यक्षात हा निधी बळीराजांसाठी मृगजळ ठरू लागला आहे. आधीच तोडका निधी त्यात लालफितीचा कारभार यात हा मदतनिधी अडकला असुन प्रत्यक्षात हा निधी देण्यासाठी मुहूर्त कधी सापडले असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा आर्थिक विंवचनेत सापडला असुन हा मदतनिधीचा पैसा त्याला वेळेवर मिळत नसल्याने संबंधित यंत्रणेकडून बळीराजाची एक प्रकारे थट्टा चालवली जात आहे.- किरण पाटील, अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी कांग्रेस, बागलाण.
बळीराजा गारपीठ अनुदानाच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 17:58 IST
कंधाणे : मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठी मुळे हाजारो एकर बाधीत होवुन शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन बळीराजाला आर्थिक फटका बसला होता शासन स्तरावरून हयाची दखल घेत तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजित चार कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या एक महीन्यापासुन प्राप्त निधी मात्र कंधाणेतील नुकसान ग्रस्त बळीराजाच्या बँक खात्यात जमा झाला नसुन संबधित यंत्रणेच्या वेळेकाढूपणामुळे हा तोडकी मदतनिधी मृगजळ ठरू लागली आहे.
बळीराजा गारपीठ अनुदानाच्या प्रतिक्षेत
ठळक मुद्देकंधाणे : बँकेच्या वेळेकाढूपणा मुळे मदतनिधी ठरतेय मृगजळ