शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनो संकटातही बॉश कंपनीत वेतन वाढ ; २३० हंगामी कामगारांना कायम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 19:44 IST

कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असताना नाशिकमधील सातपूर औद्योगित वसाहतीतील बॉश कंपनीने कामगारांना घसघशीत वेतनवाढ दिली देत सुखद धक्का दिला आहे. कंपनी व्यस्थापन आणि कामगार संघटना यांच्तील करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्यात येणार असून कामगारांना ४० महिन्यांचा फरकही मिळणार आहे.

ठळक मुद्देबॉश कंपनीत वेतन वाढीचा करार  ४० महिन्यांपासून प्रलंबीत करारावर स्वाक्षऱ्या 230 हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय

नाशिक : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून कामगारांवर आसमानी संकट कोसळले असतांना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. या करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अशा संकट काळातही २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार असल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कामगार व व्यावस्थापनामध्ये गेल्या ४० महिन्यांपासून हा करार प्रलंबित होता. दीड महिन्यांपूर्वी नवीन युनियन पदाधिकाऱ्यांनी कराराची बोलणी पुढे चालू ठेवत कंपनीचे स्थानिक व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांच्यात सकारात्मक बोलणी झाल्यानंतर रविवारी  (दि.३) उभय पक्षांनी अंतिम करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार साडेसात हजार रुपये वेतनवाढ आणि सात टक्के उत्पादन वाढ दिल्यानंतर अडीच हजार (व्हेरिएबल बास्केट) असे दहा हजार रुपये दरमहा कामगारांना मिळणार आहेत. त्यासोबतच सीपीआय डी लिंकिंगचे तीन हजार रुपये वेगळे मिळणार आहेत. दि.१ जानेवरी २०१७ रोजी हजेरी पटावर असलेल्या सर्व कायम कामगारांना ही वेतनवाढ मिळणार असून दि.३ मे पासून १३० हंगामी कामगार कायम होणार आहेत.  पुढील सहा महिन्यात उर्वरित शंभर हंगामी कामगार कायम होतील, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी दिली. या करारावर कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन, उपाध्यक्ष मुकुंद भट, मनुष्यबळ महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, तसेच सतीश कुमार,जतीन सुळे,तमाल सेन,शरद गीते यांच्यासह युनियनकडून अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, सहचिटनीस हरिभाऊ नाठे,  विनायक येवला, खजिनदार नंदू अहिरेआदिंनी स्वाक्षऱ्या केल्या. ४० महिन्यांचा फरक मिळणार व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करुन केवळ पैसे न पाहता भविष्यकाळाचा विचार केला.नाशिकच्या कारखान्यात नवीन गुंतवणूक करण्याचे आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापनाने दिले आहे.  कामगारांना ४० महिन्यांचा फरक मिळणार आहे. करारामुळे कामगारांमध्ये विश्वासाचे आणि दिलासादायक वातावरण निर्माण होणार आहे.-अरुण भालेराव. अध्यक्ष बॉश कामगार संघटना.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकEmployeeकर्मचारी