चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यामुळे गाव कोरोनामुक्त झाल्याची माहिती उपसरपंच रावसाहेब भालेराव यांनी दिली.गावात ७० कोरोनायोद्ध्यांची नेमणूक करून त्यांना सर्वेक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. दररोज सोडिअम हायड्रोक्लोराईडची फवारणी व धुरळणी करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांना धान्य व औषधासाठी आर्थिक मदत दिली. गावात कुठल्याही बाधित क्षेत्रातील व्यक्तीस गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे. यासाठी गावातील मुख्य ठिकाणी कर्मचारी व स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती असल्याने ग्रामपंचायतीमार्फत सुरळीत स्वच्छ पाणी, आरोग्यसेवा, स्वच्छतेची काळजी घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने रु ग्णवाहिका २४ तास उपलब्ध करून दिली आहे. (वा.प्र.)आजपर्यंत तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या गावात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी दिलेल्या सूचना व आवाहनाचे केलेले पालन व सरकारी यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग, सर्व सामाजिक संस्था यांच्याशी असलेल्या समन्वयामुळे कोरोना संसर्गास रोखण्यास यश आलेले आहे.- रावसाहेब भालेराव, उपसरपंच
वडनेरभैरव गाव कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:18 IST
चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यामुळे गाव कोरोनामुक्त झाल्याची माहिती उपसरपंच रावसाहेब भालेराव यांनी दिली.
वडनेरभैरव गाव कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी
ठळक मुद्देगावात ७० कोरोनायोद्ध्यांची नेमणूक करून त्यांना सर्वेक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.