शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरभैरव पोलिसांकडून १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:51 IST

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देआठ ताब्यात : ६७ शेतकऱ्यांना सव्वाकोटीची रक्कम परत

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यापासून फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे मिळाले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिघावकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे. वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून व्यापाऱ्यांकडे असलेले त्यांचे सुमारे एक कोटी २१ लाख रुपये परत करण्यात आले. पैसे परत करण्यास नकार देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिसांनी मदतीचा हात दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले आहे. दिघावकर व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल जिल्हाभरात कौतुक होत आहे.शेतकऱ्यांना पैसे परत न देणाऱ्या परराज्यातील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही व्यापाऱ्यांनी अवधी मागून घेतला आहे. द्राक्ष पिकासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व व्यापारी बांधावर येऊन माल घेत असल्याने सुरक्षेची हमी राहत नाही. शेतकरी विश्वास ठेवून परराज्यातील व्यापाऱ्यांना माल देत असतो, जर स्थानिक ग्रामपंचायतीकडून सुरक्षा म्हणून व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेतली, तर फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.-गणेश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव.

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी