----------------------------
वडनेरभैरव महावितरण कक्षातर्फे रोज भरारी पथकांकडून ज्या ठिकाणी अनधिकृत वीजवापर आढळेल, त्या ठिकाणी त्वरित संबंधित ग्राहकावर कलम १३५ नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
-प्रकाश भोये, सहाय्यक अभियंता, वडनेर भैरव
---------------------------------------
चांदवडला महावितरणची धडक मोहीम
चांदवड (महेश गुजराथी) : तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागामध्ये महावितरणमार्फत वीज चोरी विरूध्द धडक मोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांनी दिली. या मोहिमेत शहर कक्ष प्रभारी सहाय्यक अभियंता राहुल शिंदे, वडनेरभैरव कक्षाचे प्रकाश भोये, वडाळीभोईचे अमोल चौधरी, तेजराव बांगर, चांदवड ग्रामीणचे प्रदीप भालेराव हे कार्यरत आहे तर माहे एप्रिल २०२१ पासून आज रोजीपर्यंत ४२ वीज चोरीचे प्रकरणांवर महावितरण कडून कार्यवाही करण्यात आलेली आहे. या मोहिमेमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, महावितरणमार्फत वीजचोरी करणाऱ्यांना वीजचोरी न करता महावितरण कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नवीन वीज कनेक्शन घेणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच महावितरणकडून दि. २५ सप्टेंबर २१ रोजी वीज चोरीचे तसेच पी. डी. ग्राहकांच्या थकबाकीची प्रकरणेदेखील लोकअदालत, चांदवड येथे सादर करण्यात येणार आहेत. संबंधित ग्राहकांनी याबाबतचा लाभ घेऊन आपले प्रकरण तडजोडीद्वारे मिटविण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच महावितरणकडून सर्व घरगुती, औद्योगिक आणि कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुळे वीज कापणीची कटू कार्यवाही टाळावी म्हणून वीजबिल भरण्यास सहकार्य करावे, याबाबतदेखील आवाहन केले आहे. (२० चांदवड चोरी)
----------------------------
240921\24nsk_3_24092021_13.jpg~240921\24nsk_4_24092021_13.jpg
२० वडनेर १~२४ वीजचोरी चांदवड