शहरं
Join us  
Trending Stories
1
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
3
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
4
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
5
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
6
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
7
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
8
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
9
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
10
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
11
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
12
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
13
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
14
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
15
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
16
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
17
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
18
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
19
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
20
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागाव : रणरणत्या उन्हात टॅँकरपुढे महिलांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:48 IST

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि.४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीला मागील ...

ठळक मुद्देपाण्याचे टॅँकर पुरविण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून परिसरनिहाय होणे अपेक्षित होते बुधवार ‘कोरडा दिवस’ ठरला. गुरुवारीही कमी दाबाने पाणी येणार

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि.४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीला मागील काही दिवसांपासून गळती लागली असेल मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या सदर बाब उशिरा लक्षात आली असावी, असे संतप्त महिलांनी सांगितले. जलवाहिनी दुरुस्ती मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पूर्ण होऊ न शकल्यामुळे बुधवार ‘कोरडा दिवस’ ठरला. गुरुवारीही कमी दाबाने पाणी येणार असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहे. भर उन्हाळ्यात वडाळागाव परिसरात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. सकाळी वडाळागावातील दैनंदिन पाणीपुरवठा संपूर्णपणे खंडित झाल्याने नळ कोरडेठाक पडले होते. सकाळी सात ते अकरा वाजेच्या वेळेत वडाळागावसारख्या गावठाण व दाट लोकवस्तीच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर पुरविण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून परिसरनिहाय होणे अपेक्षित होते; मात्र दुपारी नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर टॅँकर गावात सुरू झाले. परिणामी कमाल तपमानाचा पारा चाळिशीच्या जवळ पोहचलेला असताना रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ‘चटके’ सहन करण्याची वेळ महिलांवर ओढवली. त्यामुळे वडाळागाव परिसरातील महिलांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारी बारा वाजेनंतर वडाळागावात दोन टॅँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली होती.

 

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी