शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

वडाळागाव : जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:01 IST

एकीकडे महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी, घरपट्टीच्या देयकावर पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे एडीस डासाची उत्पत्तीस्थान निर्माण होण्याची भीती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

नाशिक : पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक-१ येथून जाणाऱ्या कालव्याच्या जागेत विकसित करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकवरून टाकण्यात आलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली असून, त्यामधून कारंजा उडत असून, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.एकीकडे महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी, घरपट्टीच्या देयकावर पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या व व्हॉल्व्हला शहरात वारंवार ठिकठिकाणी गळती लागून शेकडो लिटर पिण्याचे पाणी दररोज कुठे ना कुठे वाया जाते. याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रचंड उदासीन असून, पाणीगळती रोखण्यास या विभागाला सपेशल अपयश येत आहे.आठवडाभरापासून या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याचा कारंजा बाहेर उडत असून, याकडे अद्याप लोकप्रतिनिधी किंवा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाºयांचे लक्ष गेलेले नाही. चढ्ढापार्कवरून गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला जोडणा-या मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीचा हा व्हॉल्व्ह असून, दिवसभर या जलवाहिनीमधील पिण्याचे पाणी व्हॉल्व्हभोवती केलेल्या हौदात वाहते. यामुळे पिण्याचे पाणी वाया जात असून, परिसरात डबके साचले आहेत. तसेच व्हॉल्व्हच्या हौदातही स्वच्छ पाणी साचत असल्याने डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजाराचा फैलावाला कारणीभूत ठरणा-या एडीस डासाची उत्पत्तीस्थान निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. जलवाहिनीमधून पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्या व्हॉल्व्हवर वीट अथवा प्लॅस्टिक ठेवून पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र जलवाहिनीचा व्यास मोठा असल्याने पाण्याचा दाबही अधिक असल्याने अपव्यय थांबविता आलेला नाही. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून गळती रोखण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक