शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

वडाळागाव : गुरूवार ठरला ‘कोरडा वार’; पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरमागे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:04 IST

पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर संंबंधित अधिका-यांना पडल्यामुळे वडाळागाव परिसरात पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे दोन दिवसांपासून आतोनात हाल होत आहे.

ठळक मुद्दे. लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंतच कुटुंबांमधील सर्वच सदस्य पाण्याच्या शोधात अपुरे टॅँकर आणि त्यामुळे उद्भवणारे भांडण सोडविताना नगरसेवकांच्याही नाकीनव दोन टॅँकरद्वारे वडाळागावाची तहान भागाविण्याचा पोरखेळपणा महापालिकेच्या प्रशासनाने केला

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले. हे संकट पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अधिक भयावह झाल्याचे चित्र गुरुवारी (दि.५) सकाळी पहावयास मिळाले. पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड उडाली. येथील एका भागात संतप्त महिलांनी रिकामे हंडे टॅँकरच्या दिशेने भिरकावत महापालिके च्या गलथान कारभाराचा निषेधही नोंदविला.

जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यासाठी मंगळवारपासून महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने ज्या भागांमधील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर या दुरुस्ती कालावधीत परिणाम होणार आहे, त्या परिसराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले; मात्र याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर संंबंधित अधिका-यांना पडल्यामुळे वडाळागाव परिसरात पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे दोन दिवसांपासून आतोनात हाल होत आहे. लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंतच कुटुंबांमधील सर्वच सदस्य पाण्याच्या शोधात हंडे, कळशी, बादली घेऊन घराबाहेर भटकंती करताना बुधवारपासून दिसून येत आहे. ज्या भागात टॅँकर पोहचला त्या भागात धाव घेऊन मिळेल तेवढे पाणी घेत घर गाठायचे असा जणू उपक्रमच बुधवारपासून दोन दिवस वडाळावासीयांचा सुरू होता. अपुरे टॅँकर आणि त्यामुळे उद्भवणारे भांडण सोडविताना नगरसेवकांच्याही नाकीनव आले. काही परिसरात नगरसेवकांना महिलांच्या रोषाचा सामनाही करावा लागल्याचे दिसून आले. अवघे दोन टॅँकरद्वारे वडाळागावाची तहान भागाविण्याचा पोरखेळपणा महापालिकेच्या प्रशासनाने केला हे विशेष! यामुळे ओढावलेले जलसंकट अधिक वाढले आणि नागरिकांचा संतापही यामुळे दिसून आला. ज्या भागात टॅँकर पोहचले त्या भागातील लोक आनंदी मात्र दुस-या भागातील लोकांनी तिकडे धाव घेतल्यास आपआपसांत भांडण होऊन हंड्यांची फेकाफेकही झाली.

टॅग्स :water transportजलवाहतूकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका