शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

गोठ्यांमधील मलमुत्र वडाळा रस्त्यावर; रहिवाशांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:43 IST

गोठेधारकांनी गोठ्यांमधील म्हशींचे मलमुत्र वाहून नेणाऱ्या मलवाहिन्या थेट महापालिकेच्या भुमिगत गटारीत जोडल्या असल्यामुळे अनेकदा मैला साचून गटारी नादुरूस्त होऊन मलमुत्र रस्त्यावर पसरते.

ठळक मुद्देप्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात रहिवाशांनी मंगळवारी (दि.८) रास्ता रोको आंदोलन प्रचंड दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक : आठवडाभरापासून वडाळारोडवरील प्रभाग २३मधील जयदीपनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत रस्त्यावर गोठ्यांमधील मलमुत्र मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले. वारंवार तक्रार करुनही याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून कु ठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात रहिवाशांनी मंगळवारी (दि.८) रास्ता रोको आंदोलन केला.वडाळागावासह वडाळारोड परिसर म्हशींच्या गोठ्यांसाठी ओळखला जातो. अस्वच्छता, घाणीचे साम्राज्यामुळे नेहमीच हा परिसर चर्चेत असतो.

गोठेधारकांनी गोठ्यांमधील म्हशींचे मलमुत्र वाहून नेणाऱ्या मलवाहिन्या थेट महापालिकेच्या भुमिगत गटारीत जोडल्या असल्यामुळे अनेकदा मैला साचून गटारी नादुरूस्त होऊन मलमुत्र रस्त्यावर पसरते. त्यामुळे अनेकदा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. मागील आठ दिवसांपासून पुन्हा या भागातील गटारी रस्त्यावर वाहू लागल्यामुळे सर्वत्र मलमुत्र पसरल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.

यामुळे जयदीपनगर, मिल्लतनगर, चिश्तीया कॉलनी हा संपुर्ण परिसर वडाळा रस्त्याच्या दुतर्फा असल्याने बाधित झाला होता. या भागात प्रचंड दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. ही बाब नगरसेवक शाहीन मिर्झा यांच्या निदर्शनास रहिवाशांनी आणून दिली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मिर्झा यांनी अधिका-यांना याबाबत विचारणा करुन तत्काळ गटारी दुरूस्तीचे आदेश दिले मात्र संबंधितांनी त्यांच्या आदेशाला वटाण्याच्या अक्षता लावल्या. अखेर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक मंगळवारी सकाळी पहावयास मिळाला. सर्व कॉलन्यांमधील महिला व पुरूषांनी एकत्र येत मिर्झा यांना बोलावून घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

 

गोठेधारकांविरोधात पर्यावरण रक्षण कायद्यान्वये गुन्हावडाळा गावालगत असलेल्या जेएमसीटी कॉलेजजवळील म्हशींच्या गोठ्यातील मलमूत्र हे सार्वजनिक रस्ता तसेच परिसरात उघड्यावर सोडल्याने दुर्गंधी पसरवली आहे़या गोदावरील व नंदीनी नदी प्रदुषित होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ या प्रकरणी विनोद माडीवाले यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीवरून  गोठेमालक हैदर खोत डेअरी, वसिम गुलाम गौस कोकणी, बिलाल कोकणी, सांडू हाजी कोकणी, दस्तगिर कोकणी, गुलाम गोस, शहनवाझ कोकणी यांच्या विरोधात पर्यावरण रक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका