इंदिरानगर : मुंबई-आग्रा महामार्ग आणि वडाळा-पाथर्डी रस्त्यावर पहाटेपासून मोठय़ा प्रमाणात वर्दळ असल्याने परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात दाखल झालेल्या भाविकांमुळे सर्वत्र गर्दी झाली होती. इंदिरानगर, विनयनगर, सार्थकनगर, पांडवनगरी, शरयूनगरी, सर्मथनगर, साईनाथनगर, राजीवनगर, चैतनानगर, राणेनगर, वासननगर, पाथर्डी फाटा आदिंसह परिसरातून हजारो भाविक पंचवटीकडे रवाना झाले. इतर राज्यांतून आलेले भाविक इंदिरानगर परिसरातील आपल्या आप्तेष्टांकडे मुक्कामी असल्याने सकाळी परिसरातून मोठय़ा प्रमाणात भाविक दिसत होते.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर भाविकांची रीघ
By admin | Updated: September 13, 2015 22:31 IST