शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावातील महापालिकेची उर्दू शाळा की कोंडवाडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:36 IST

वडाळागावात महापालिकेची उर्दू शाळा आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या शाळेतील वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या या कारभाराबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देतीव्र नाराजी । वर्गात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

इंदिरानगर : वडाळागावात महापालिकेची उर्दू शाळा आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या शाळेतील वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या या कारभाराबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शेतकरी व हातावर काम करणारी लोकवस्ती म्हणून वडाळागाव ओळखले जाते. सुमारे पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या गावात सुमारे ५० टक्के हातावर काम करणारे नागरिक आहेत. गावात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात दोन शाळा आहेत. यापैकी एक शाळा सारडा सर्कल येथे तर दुसरी शाळा वडाळागावात आहे.सारडा सर्कल येथे गावातील विद्यार्थीवर्गास ये-जा करण्यास शहर वाहतूक बससेवा नसल्यामुळे आणि खासगी वाहनाने आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याने पालकवर्ग पाठवत नाही. वडाळागावच्या उर्दू शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.यामध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात सुमारे ११०, इयत्ता नववीच्या वर्गात ९४, इयत्ता दहावीच्या वर्गात ७३ याप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे एका बेंचवर चार ते पाच विद्यार्थी दाटीवाटीने बसविण्यात येतात. विद्यार्थ्यांना वहीवर अभ्यास लिहिताना तारेवरची कसरत करावी लागते. नियमानुसार एका वर्गात ४५ ते ५० विद्यार्थी पाहिजे. परंतु ३० ते ३५ विद्यार्थी जास्त आहेत.अशीच परिस्थिती प्राथमिक शाळेची आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्यासुद्धा अपुरी आहे. शासनाच्या वतीने घरोघरी जाऊन शिक्षणापासून कोणी विद्यार्थी वंचित राहता कामा नये यासाठी दखल घेतली जाते आणि दुसरीकडे महापालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नाही. महापालिकेच्या या कारभारबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा