शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्ही.व्ही.आयपींचा दौरा : पॅराग्लायडर्सपासून ड्रोनपर्यंत सर्वांना ‘आकाशबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 14:01 IST

शहरात आगामी काही दिवसांमध्ये अतीमहत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे दौरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन सतर्क

ठळक मुद्देकलम १४४ अन्वये मनाई आदेश जारीवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पुर्वपरवानगी आवश्यकदेशाविरूध्द कृती करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई

नाशिक : शहरात चालू आठवड्यात व्हीआयपी, व्ही.व्ही.आय.पी दर्जाच्या व्यक्तींचे संभाव्य दौरे लक्षात घेता पोलीस आयुक्तालय हद्दीत सुरक्षेच्यादृष्टीने चोख नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे विशेष शाखेचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कलम १४४ लागू करण्यात आला असून सर्व प्रकारच्या हवाई साधनांना ‘आकाशबंदी’ करण्यात आल्याचा आदेश जारी केला आहे.

शहरात आगामी काही दिवसांमध्ये अतीमहत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे दौरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच उपाययोजनांवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नाही, म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. पाटील यांनी या पार्श्वभूमीवर कलम १४४ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या हवाई साधनांना पोलीस आयुक्तालय हद्दीत निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅँग ग्लायडर्स, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून्स, खासगी हेलिकॉप्टर्स, ड्रोन यांसारख्या विविध हवाई साधनांच्या उड्डाणावर येत्या शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आल्याचे मनाई आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.महत्त्वाच्या व अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या थांबण्याच्या ठिकाणांना संवेदनशील भाग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या विशेष दर्जाच्या व्यक्तींचे हेलिपॅडची जागा तसेच रस्ता मार्ग परिसरात कुठल्याहीप्रकारच्या हवाई साधनांचा वापर करता येणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या आदेशाविरूध्द कृती करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत.
पुर्वपरवानगी आवश्यकमहत्त्वाच्या व अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौ-याच्या कालावधीत ड्रोनद्वारे हवाई चित्रीकरण एखादी व्यक्ती, संस्था, शासकिय अस्थापनांना करावयाचे असल्यास त्यासाठी संबंधीत पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासनाकडून परवानगी न घेता हवाई साधनांचा विशेषत: ड्रोनचा वापर चित्रीकरणाच्या कारणासाठी केल्यास संबंधितावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मनाई आदेशात (कलम-१४४) स्पष्ट करण्यात आले आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयParaglidingपॅराग्लाइडिंगNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील