शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

नाशकात बीएसएनएलच्या ६५० कर्मचऱ्यांना व्हीआरएसची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 13:59 IST

नाशिक जिल्ह्यात सुमारे बीएसएनलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज  चालू शकते . त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावरील सुरक्षा रक्षक आणि अन्य खर्चात बीएसएनएलने यापूर्वीच कपात केली आहे. 

ठळक मुद्दे बीएसएनएलकडून कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याची तयारी नाशकातील साडेसहाशे कर्मचारी अतिरिक्त ठरण्याची शक्यता

नाशिक : आर्थिक संकटात असलेल्या बीएसएनलकडून कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देऊन कर्मचारी कपात करण्याची शक्यता असून नाशिकमधील सुमारे साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे बीएसएनलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज  चालू शकते अशी माहिती नाशिक महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावरील सुरक्षा रक्षक आणि अन्य खर्चात बीएसएनएलने यापूर्वीच कपात केली असून यात आता कर्मचारी कपातीची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून( भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर जी स्पेट्रकमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून संकट स्थितीवरही मात करून बीएसएसएल दुर्गम भागातील परवडणाºया सेवेसह देशातील आपात्कालीन स्थितीतही सेवा सुरूच ठेणार असल्याची ग्वाही बीएसएनलचे महाव्यवस्थापक संजय कुमार सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.  बीएसएनएलला आर्थिक सहकार्यासाठी कें द्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने लाल दिवा दाखवून सेवा बंद करण्याचा सल्ला दिल्याने बीएसएनल बंद होण्याच्या चर्चांना उधान आले असतानाच बीएसएनलचे मुख्य महाव्यवस्थापक संजयकुमार सिन्हा यांनी प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून बीएसएनल बंद होणार नसल्याचा खुला केला आहे.  बीएसएनल पुनरुज्जीवनासाठी सक्रिय असून बीएसएनएलच्या पुनरुज्जीवणासाठी कर्मचाºयांना व्हीआरएस देण्यासोबतच आणि फोर जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सिन्हा यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. त्यासोबच बीएसएनएलकडे उपलब्ध असलेल्या मालमत्तांचे मॉनिटरेशन करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून यामाध्यमातू आर्थिक पाठबळ उभे करून नैसर्गिक आपत्तीच्या कठीण काळात आणि अगदी दुर्गम ठिकाणीही परवडणारी सेवा बीएसएनएलक डून सुरूच ठेवली जाणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानNashikनाशिकBSNLबीएसएनएल