शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:24 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षाच्याच उमेदवाराला माघार घेण्यासाठी दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला आहे.

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षाच्याच उमेदवाराला माघार घेण्यासाठी दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी (दि. २३) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यात भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव, भाजपाच्याच तिकिटावर गेल्यावेळी लढलेल्या कीर्ती शुक्ल आणि मनसेच्या डमी उमेदवार रश्मी सचिन भोसले यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात मनसेच्या अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण, भाजपाच्या विजया हरीश लोणारी यांच्यासह अपक्ष उमेदवार ज्योती नागराज पाटील, समीना कयूम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक व राष्टÑवादीच्या बंडखोर उमेदवार रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समीमा मकसूद खान यांच्यात लढत होणार आहे. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले गेले; परंतु त्यात यश आले नाही. मनसेच्या उमेदवाराला कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने पाठिंबा दर्शविला आहे. मनसेच्या उमेदवारासमोर शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांनी तगडे आव्हान उभे केले आहे, तर भाजपानेही उमेदवार दिल्याने खºया अर्थाने तिरंगी सामना रंगणार आहे. शनिवारी (दि. २४) उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून, त्यात २४ हजार १४० पुरुष, तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. ४ एप्रिल पर्यंत प्रचारासाठी अवधी असल्याने उमेदवारांनी घरोघरी जाऊन संपर्क साधण्यास सुरुवातही केली आहे. दि. ६ एप्रिल रोजी मतदान होऊन ७ एप्रिलला गंगापूररोडवरील शिवसत्य मैदानात मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.भाजपा उमेदवारावर दबावमनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भाजपातील काही पदाधिकाºयांचा एक गट प्रयत्नरत होता. त्यानुसार, सकाळी भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात शहराध्यक्षांसमवेत पदाधिकाºयांची बैठक झाली. यावेळी, पक्षाच्या उमेदवार विजया लोणारी यांनी माघार घ्यावी, यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यापूर्वी दोन वेळा माघार घेण्यास भाग पाडल्याने लोणारी यांनी माघारीस स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पदाधिकाºयांचा नाइलाज झाला. अखेर, डमी उमेदवार कीर्ती शुक्ल आणि माधुरी जाधव यांचेच अर्ज मागे घेण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक