नाशिकरोड : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होत असून, यानिमित्ताने मतदारसंघातील शाळांना सुटी देण्यात आलेली नसल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी रविवारी (दि.२४) सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मतदारांना विशेष नैमित्तिक रजा घेण्याची किंवा उशिरा कामावर हजर होण्याचा यापैकी एक पर्याय वापरता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची सोमवारी (दि.२५) निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यासाठी राजाराम माने यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपायुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, तहसीलदार सुनंदा मोहिते आदी उपस्थित होते. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मतदान प्रक्रि या पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात असून ५३ हजार ३३५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विभागातील एकूण ९४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, एक मायक्र ो आॅब्झर्वर, एक शिपाई अशा सहा कर्मचाऱ्यांसह संपूर्ण विभागात ५६४ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार क्षेत्रिय अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. राखीव कर्मचाºयांसह ७०७ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. आज सायंकाळी मतदानप्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर सर्व पाचही जिल्ह्यांतील मतपेट्या सोमवारीच मतमोजणीच्या ठिकाणी सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, अंबड, नाशिक येथे सुरक्षा कक्षात जमा केल्या जाणार आहेत.मोबाइलला परवानगी नाही मतदान केंद्रावर मतदारांसह उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मोबाइलसह इतर कोणत्याही स्वरूपाचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करणाºयांविरोधात कडक कारवाई करण्याचे अधिकार संबंधित मतदान केंद्र अधिकाºयांना देण्यात आलेले आहेत.
शिक्षक मतदारसंघ मतदान; आज शाळांना सुटी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:24 IST