शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

राज्यात रमजानपूर्व संपणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:54 AM

निवडणुकीवर ‘रमजान’चा सकारात्मक प्रभाव

- अझहर शेखनाशिक : मुस्लिम समाजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या पवित्र रमजान पर्वाला ६ मेपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्याचे मतदान ११ एप्रिल, तर अखेरच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.रमजान पर्वमध्ये मुस्लिम बांधवांची दिनचर्या बदललेली पहावयास मिळते. १५ ते १६ तासांचे निर्जळी उपवास (रोजा) या काळात महिनाभर केले जातात. तसेच पाचवेळेच्या नमाजपठणासह रात्री उशिरापर्यंत ‘तरावीह’ची विशेष नमाज मुस्लीम बांधव पठण करतात. या महिन्यात उपासनेवर अधिकाधिक भर दिला जातो; मात्र मतदानप्रक्रियेत त्याचा कुठलाही अडसर निर्माण होत नाही. कारण देशभरात मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते. त्यामुळे या वेळेत जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन लोकशाहीचा अधिकार मुस्लीम नागरिकदेखील सहजरीत्या बजावू शकतात, असे नाशिक शहरातील धर्मगुरूंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महाराष्टÑात रमजानला प्रारंभ होण्याअगोदरच मतदान प्रक्रिया आटोपत आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम जाणवणार नाही. तसेच काही राज्यांत निवडणुकीच्या तारखा रमजान पर्वकाळात येत असल्या तरी त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही. मुस्लीम नागरिक लोकशाही व संविधानाने दिलेला हक्क निश्चितपणे प्राधान्याने बजावतील, यात शंका नाही.-हाफीज हिसामुद्दीन अशरफी,शहर-ए-खतीब्भारतीय मुस्लीम परंपरेप्रमाणे पहाटे ‘रोजा’ करण्यापूर्व सहेरीचा विधी पूर्ण करेल आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात नमाजपठणाने करेल. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मतदान केंद्रांवर जाऊन लोकशाहीने दिलला अधिकार अंमलात आणेल.- सय्यद मीर मुख्तार,सुन्नी मुस्लिम सीरत समिती, नाशिक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानMuslimमुस्लीम