शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनो, रविवारी पोहचा मतदान केंद्रांवर

By संदीप भालेराव | Updated: September 8, 2022 14:27 IST

मतदारयादी अधिकाधिक शुद्ध करण्याबरोबरच यादीतील दुबारनावे शोधून काढण्यासाठी मतदारयादीला आधारकार्ड जोडणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

नाशिक: मतदारयादी अधिकाधिक शुद्ध करण्याबरोबरच यादीतील दुबारनावे शोधून काढण्यासाठी मतदारयादीला आधारकार्ड जोडणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवारी (दि.११) नाशिक जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर आधार जोडणी शिबीर होणार आहे. त्यामुळे मतदारांना अधिक धावाधाव करावी लागणार नसून आपापल्या मतदान केंद्रांवर पोहचून नोंदवणी करता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक   मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्यासाठी रविवार दि. ११  रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आपले आधारकार्ड व मतदार ओळखपत्र जोडणी करूण घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ४६८१ केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. ‘व्हेाटर हेल्पलाईन ॲप’ द्वारे देखील मतदार ऑनलाईन स्वरूपात मतदार यादीला आधार जोडणी करू शकतात.जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार ४५ लाख ९१ हजार ९२४ मतदारांपैकी एकूण ५ लाख ८२ हजार ३४२ मतदारांनी आपले ओळखपत्र आधारकार्डशी जोडणी केलेले असून १२.६८ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. मतदारांनी या उपक्रमास जास्तीत जास्त सहभाग नोंदवून प्रतिसाद द्यावा, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी   थविल यांनी कळविले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक