शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा सेल्फीसाठी उत्साह ;तरुणांसह जेष्ठांनाही सेल्फीवॉलचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 19:21 IST

Maharashtra Election 2019नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी), आरपी विद्यालय, मखमलाबाद नाका, गणेशवाडीतील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मखमलाबाद , पेठरोड आदि विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानानंतर आपले बोट दाखवत सेल्फी काढण्याचा उत्साह दिसून आला

ठळक मुद्देमतदानानंतर सेल्फी काढण्याची उत्सूकता मतदारांमध्ये दिसून आला सेल्फीचा उत्साहतरुण, तरुणींसह महिला व ज्येष्ठांनाही आकर्षण

नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरात सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून येत असताना मतदान झाल्यानंतर मतदारांनी मतदानाच्या आठवणी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सेल्फी काढण्याचाही उत्साह   दाखविल्याने विविध मतदान केंद्रावर मतदानानंतर सेल्फीसाठीही मतदारांची गर्दी दिसून आली. अधिक मतदार संख्या असलेल्या केंद्रावर प्रशासनाकडून दोन ते तीन सेल्फी वॉलचे नियोजन केल्यामुळे मतदारांना लवकर सेल्फी घेऊन मतदान केंद्राबाहेर पडता आले. शहरातील नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी), आरपी विद्यालय, मखमलाबाद नाका, गणेशवाडीतील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मखमलाबाद , पेठरोड आदि विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानानंतर आपले बोट दाखवत सेल्फी काढण्याचा उत्साह दिसून आला. यात महिला, तरुण, तरुणींसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. अनेक मतदारांनी मतदान झाल्यानंतर सेल्फी काढले. तर काही मतदारांनी आपले बोट धाखवत व्हिडीओ  काढून ते सोशल मिडियावर शेअर करीत अन्य नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानासाठी आलेल्या दाम्पत्यांनही सेल्फी वॉलमागे उभे राहून सेल्फी काढून घेत विधानसभा निवडणूक 2019 मधील मतदानाच्या आठवणी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केल्या.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-east-acनाशिक पूर्वSelfieसेल्फीVotingमतदान