नाशिक : नाशिक महानगरपालिकेसाठी मंगळवारी (दि. २१) शहरात मतदान घेण्यात आले. सिडको, कामटवाडे तसेच अंबड परिसरात मतदानाची नियोजित वेळ संपल्यानंतरही मतदारांनी मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्याचे चित्र बघायला मिळाले. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक मतदार साडेचारनंतर मतदानासाठी बाहेर पडले. सिडको येथील मविप्र संचलित केएसकेडब्ल्यू महाविद्यालय, मोरवाडी येथील उत्कर्ष मित्रमंडळ, विखे पाटील शाळा, राणाप्रताप चौक येथील विवेकानंद विद्यालय, कामटवाडे येथील मीनाताई ठाकरे विद्यालय, त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालय आदि ठिकाणी दुपारी मोठ्या प्रमाणात मतदारांनी मदानासाठी गर्दी केली होती. उत्तमनगर येथील केएसकेडब्ल्यू महाविद्यालयात मंगळवारी साडेपाच वाजता महाविद्यालयाचा मुख्य दरवाजा बंद करून मतदानासाठी आलेल्या नागरिकांना आत सोडण्यात आले. एकाच वेळी मतदारांची एवढ्या प्रमाणात गर्दी झाल्याने मतदान केंद्र्रावरील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. महाविद्यालयाच्या दर्शनी भागात मतदार एकाच ठिकाणी गोळा झाल्याने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना गर्दीचे नियोजन करताना अडचणींचा सामना क रावा लागला. मतदान केंद्रात येण्याजाण्यासाठी एकच दरवाजा असल्याने येथील सुरक्षायंत्रणेवरदेखील मोठ्याप्रमाणात ताण पडत होता. (प्रतिनिधी)उत्तमनगर येथील महाविद्यालयात संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर महाविद्यालयाच्या मुख्यालयात झालेली मतदारांची गर्दी.
मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांची गर्दी
By admin | Updated: February 22, 2017 01:12 IST