मालेगावी मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:10 PM2019-04-29T13:10:01+5:302019-04-29T13:10:28+5:30

मालेगांव : येथील गर्ल्स हायस्कुलमधील मतदान केंद्र क्रमांक ११० वरील यंत्र बंद पडले होते.

Voter turnout due to closure of Malegaon polling machine | मालेगावी मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांचे हाल

मालेगावी मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांचे हाल

Next

मालेगांव : येथील गर्ल्स हायस्कुलमधील मतदान केंद्र क्रमांक ११० वरील यंत्र बंद पडले होते. यामुळे मतदारांची मोठी रांग लागली होती. तहसीलदार चंद्रजित राजपुत, तलाठी शरीफ शेख यांनी नवीन मतदान यंत्र उपलब्ध केल्यानंतर तब्बल ३५ मिनिटांच्या खोळंब्यानंतर मतदान सुरळित सुरू झाले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक याप्रमाणे मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर सर्व महिला कार्यरत असतील. त्या अनुषंगाने मालेगांव तालुक्यातील टोकडे गावात सखी मतदान केंद्र कार्यान्वित झाले आहे.या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या निवडणूक कार्यावर असलेल्या कर्मचारी सर्वच जण महिला आहे. सखी मतदार केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सखी मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक आण िसुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील साफसफाईवर विशेष भर देण्यात आला आहे.

Web Title: Voter turnout due to closure of Malegaon polling machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक