शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जपानहून परतलेल्याचे स्वेच्छेने होम क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:56 IST

होम क्वॉरण्टाइनचा सल्ला दिलेला असताना पळून जाणाऱ्या कोरोना संशयितांच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असल्या व पळून जाणाऱ्यांचे उद्देश वेगवेगळे असले तरी जपानमध्ये दोन महिने राहून परतलेल्या नांदगावच्या एका व्यक्तीने गेले तीन आठवडे स्वेच्छेने स्वत:ला होम क्वॉरण्टाइन करून घेतल्याचे सामाजिक बांधिलकी जपणाºया जाणिवांचे एक चांगले उदाहरण समोर आले आहे.

ठळक मुद्देनांदगाव : कोरोनाला पराभूत करणारी आचरली जीवनशैली

नांदगाव : होम क्वॉरण्टाइनचा सल्ला दिलेला असताना पळून जाणाऱ्या कोरोना संशयितांच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असल्या व पळून जाणाऱ्यांचे उद्देश वेगवेगळे असले तरी जपानमध्ये दोन महिने राहून परतलेल्या नांदगावच्या एका व्यक्तीने गेले तीन आठवडे स्वेच्छेने स्वत:ला होम क्वॉरण्टाइन करून घेतल्याचे सामाजिक बांधिलकी जपणाºया जाणिवांचे एक चांगले उदाहरण समोर आले आहे.जपानहून विमानाने पुणे येथे उतरल्यानंतर आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार १४ दिवस पुणे येथे होम क्वॉरण्टाइनचे नियम पाळून स्वत:ला समाजापासून विलग करून कोरोना नसल्याचा निर्वाळा मिळाल्यावर ही व्यक्ती नांदगाव येथे आली. त्यानंतर ती स्वयंप्रेरणेने स्वत:वर लादलेल्या होम क्वॉरण्टाइनमध्येच आहे. आपला मुलगा घरी येत असल्याचे कळाल्यावर, वडिलांनी त्याच्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली. खोली व त्याचे सामान पूर्ण निर्जंतुक केले. अगदी जेवायला देताना व इतर बाबीत त्याच्यापासून चार ते पाच फुटांचे अंतर ठेवूनच सर्व दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले. युवक, त्याचे आई वडील व बहीण असे चार जण घरी राहतात. एवढी काळजी घेऊन कोरोनाशी सामना झालाच तर घरातल्या चौघांशिवाय पाचव्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ नये अशी खबरदारी घेत जवळचे नातेवाईक असोत, की कामावर येणारे त्या सर्वांना सुट्ट्या देण्यात आल्या.नांदगाव येथे येण्यापूर्वी ‘तो’ जपानमध्ये असताना तिथे मास्कचा तुटवडा झाला. मास्क मिळेना म्हणून त्याच्या कंपनीने मुंबईहून सिंगापूरपर्यंत आपला माणूस पाठवला आणि तिथून मास्क दुसºया विमानाने जपानला पाठवला. आंतरराष्ट्रीय कंपनी आपल्या माणसाला किती महत्त्व देते या अनुभवाबरोबरच जपानी लोकांमधली जागरूकता त्याने अनुभवली. या साºया अनुभवाबाबत तो म्हणाला की, ते कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेतात. नियमांचे काटेकोर पालन करतात. तोच नियम मी पाळत आहे. आज मी नांदगावच्या घरातून काम करत आहे, असे या व्यक्तीने सांगितले.नांदगावला आल्यावर येथील डॉ. रोहन बोरसे यांना त्याने आपल्या आरोग्याची माहिती दिली. त्यांनीसुद्धा तपासणी केली. कोरोनाला घाबरायचं नाही. पण काळजी घ्यायची, आपल्याला होणार नाही आणि दुसºयालाही होणार नाही, असे मत त्याने व्यक्त केले. कोरोना होऊच नये; परंतु तशी वेळ आलीच तर तो कुटुंबापुरताच मर्यादित राहावा. समाजात त्याचा संसर्ग पसरू नये. या विचारांवर आधारित जीवनशैली गेली तीन आठवडे जगतांना या कुटुंबाने एक आदर्श निर्माण केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य